शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Naegleria Fowleri Virus: मेंदू खाणारा 'व्हायरस', या देशात पहिल्या रुग्णाचा मृत्यू; जाणून घ्या किती घातक आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 4:19 PM

Naegleria Fowleri Virus: गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच एका नवीन व्हायरसची माहिती समोर आली आहे.

Brain Eating Virus: गेल्या तीन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये दररोज लाखो लोकांना संसर्ग होत आहे, तर शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. यादरम्यान एक नवीन बातमी ऐकायला मिळत आहे, ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. कोरियामध्ये एका व्यक्तीच्या शरीरात मेंदू खाणारा व्हायरस आढळला आहे.

दक्षिण कोरिया टाईम्सच्या म्हणण्यानुसार, थायलंडहून परतलेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा 'ब्रेन इटिंग अमिबा' म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेग्लेरिया फॉउलरीच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी 10 डिसेंबर रोजी कोरियाला परतण्यापूर्वी या व्यक्तीने थायलंडमध्ये एकूण चार महिने घालवले होते. संध्याकाळी जेव्हा रुग्ण परत आला, तेव्हा त्याला डोकेदुखी, ताप, उलट्या, बोलण्यात अडचण आणि मान ताठ अशी लक्षणे आढळली.

दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 21 डिसेंबर रोजी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरियन हेल्थ एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मृत्यूचे कारण नेग्लेरिया फॉउलरी आहे. दक्षिण कोरियामध्ये हा रोगाचा पहिला ज्ञात रुग्ण आहे. KDCA ने अद्याप संक्रमण कशामुळे झाले, हे सांगितले नाही. पण, विषाणूचे दोन मुख्य स्त्रोत दूषित पाण्यात पोहणे आणि संक्रमित पाण्याने नाक धुणे हे सांगितले जात आहे. Naegleria fowleri चे पहिले प्रकरण 1937 मध्ये व्हर्जिनिया, युनायटेड स्टेट्स येथे नोंदवले गेले होते.

याला 'ब्रेन इटिंग अमिबा' म्हणतातयुनायटेड स्टेट्स नॅशनल पब्लिक हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, नेग्लेरिया फॉवलेरी हा एक अमिबा (एक पेशी असलेला सजीव) आहे. हा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या पाण्यात राहतो. याला 'ब्रेन इटिंग अमिबा' असे म्हणतात. हा अमिबा नाकावाटे मेंदूपर्यंत जातो. युनायटेड स्टेट्समध्ये दरवर्षी तीन लोकांना याचा संसर्ग होतो. हे संक्रमण प्राणघातक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य