पॅरिस : महाराष्ट्रातील जैतापूर अणु प्रकल्पाला चालना देणे आणि ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासह भारत आणि फ्रान्स दरम्यान १७ करार करण्यात आले आहेत. नागपूरसह तीन शहरांत स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा फ्रान्सने केली.चार दिवसांच्या फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील प्रमुख उद्योगपतींशी संवाद साधून त्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केले. तसेच फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, संरक्षण, शैक्षणिक, सांस्कृतिक अणु आणि आर्थिक सहकार्याबाबत चर्चा केली. चर्चेनंतर संयुक्त परिषदेत पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांनी भारत आणि फ्रान्स दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती दिली. फ्रान्सची अरेवा ही कंपनी जैतापुरात १०,००० मेगावॅट क्षमतेच्या ६ अणुभट्ट्या उभारणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदी दरावरून मतभेद असल्याने तो रखडला होता.नाव पे चर्चा...पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोईस ओलांद यांनी शुक्रवारी ‘नाव पे चर्चा’ केली. त्याआधी उभय नेत्यांची द्विपक्षीय सहकार्याबाबत शिखर चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी ला सिने नदीत फेरफटका मारून नौकाविहाराचा (क्रूझ बोट) आनंद घेतला. दोघांनी भारत-फ्रान्स संबंधाच्या अनुषंगाने मनमोकळी चर्चा केली. सर्वधर्मसमभाव जोपासणारहिंदुत्ववादी संघटनांच्या अल्पसंख्याकविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वधर्मसमभाव जोपासण्यासह सर्व धर्मीयांचे हक्क व स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ग्वाही युनेस्कोतील भाषणात दिली.भारतात काही ठिकाणी चर्चवर झालेले हल्ले व संघ परिवाराच्या घर वापसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दिलेल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होते. (वृत्तसंस्था)
फ्रान्सच्या मदतीने नागपूर ‘स्मार्ट सिटी’
By admin | Published: April 11, 2015 1:14 AM