शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

नायगरा धबधबा गोठला बर्फाने, स्वर्गासारखंं दृश्य पाहायला पर्यटकांची वाढती गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 4:15 PM

सगळीकडेच थंडीचा तडाका वाढलाय हे तर आपण गेले काही दिवस वाचत आहोतच. आता अख्खाच्या अख्खा नायगरा धबधबा बर्फासारखा गोठल्याने एक विहंगमय दृश्य निर्माण झाले आहे .

ठळक मुद्देसध्या विविध सोशल मीडिया साईट्सवर नायगरा धबधब्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.हे फोटो पाहिल्यावर पृथ्वीवर स्वर्ग तयार झाल्यासारखा भास होतो. सगळीकडे पांढरी चादर पसरल्याने त्या प्रदेशांना एक वेगळाच लुक प्राप्त झालाय.

उत्तर अमेरिका : थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत जातो आहे. भारतातही तापमान चांगलंच खाली उतरलंय. पण अमेरिका आणि कॅनडामध्ये तर चक्क तापमान उणे ३० ते उणे ४० च्या घरात असल्याने तिथं सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली दिसते आहे. उत्तर अमेरिकेतला नायगरा धबधबा तर पूर्णपणे बर्फाने गोठला आहे. जगभरातील पर्यटकांसाठी नायगरा धबधबा प्रचंड प्रसिद्ध आहे. लोकांनी आता तिथे जाऊन फोटोग्राफी करायला सुरुवात केली आहे.

सध्या विविध सोशल मीडिया साईट्सवर नायगरा धबधब्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यावर पृथ्वीवर स्वर्ग तयार झाल्यासारखा भास होतो. सगळीकडे पांढरी चादर पसरल्याने त्या प्रदेशांना एक वेगळाच लुक प्राप्त झालाय.

नायगरा धबधबा आंतरारष्ट्रीय पर्यटकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यात आता सगळीकडे बर्फाच्छदित प्रदेश तयार झाल्याने इथं लोक मुद्दाम भेट द्यायला येत आहेत. खरंतर तापमान एवढं खाली उतरलंय की घराच्या बाहेर पडणंही मुश्किल बनलं आहे. सध्या इथं उणे १४ अंश सेल्सिअस तापमान आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. 

म्हणूनच इकडच्या नद्या, धबधबे गोठले आहेत. निसर्गाने पांढरी चादर ल्यायल्यासारखा इकडचा परिसर दिसत असल्याने लोकांनी हे दृष्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे.

या धबधब्यातून प्रत्येक सेकंदाला ३ हजार टन पाणी खाली पडत असतं. पण हे पाणी गोठल्यामुळे सगळीकडे बर्फ पसरला आहे. नद्या,नाले सारं काही गोठलं आहे. त्यामुळे या प्रदेशाला स्वर्गाचं रुप प्राप्त झालंय. 

कॅनडामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांनी गरम पाणी फेकल्याने त्याचं लगेच बर्फ तयार झालेलंही आपण पाहिलं. अंटार्टिका एमंडसन स्कॉट वेदर स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार १९९३ सालच्या थंडीनंतर कॅनडामध्ये ए‌वढी थंडी पहिल्यांदाच पडली आहे.

आणखी वाचा - कॅनडात तापमान -४० अंश, उकळत्या पाण्याचं झालं बर्फात रुपांतर

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयtourismपर्यटन