ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ७ - अमेरिकेच्या नौदलातील माजी जवानाने ओसामा बिन लादेनला मारल्याचा दावा केला आहे. रॉब ओनील असे या जवानाचे असून ही गोपनीय माहिती उघड करणे रॉब यांना चांगलेच महागात पडू शकते. गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी रॉबर्टवर कारवाईदेखील होऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
२०११ मध्ये अमेरिकन नौदलाच्या सील (sea, air, land) याविशेष पथकाने पाकिस्तानमधील इस्लामाबादजवळील गावात लपून बसलेल्या ओसामा बिन लादेनला ठार मारले होते. या मिशनमध्ये २३ जवानांचा समावेश होता. गेल्या तीन वर्षांपासून या जवानांविषयीची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. मात्र आता अमेरिकन सैन्यातून निवृत्त झालेल्या रॉब ओनील या जवानाने ओसामाला ठार मारल्याचे म्हटले आहे. 'मी झाडलेली गोळी ओसामाच्या कपाळाला लागली' असे ओनीलने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. ही मुलाखत पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे समजते. ही मुलाखत पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार असल्याचे समजते. मात्र अमेरिकेतील संरक्षण मंत्रालय ओनील व मुलाखत प्रसिद्ध करणा-या प्रसारमाध्यमाविरोधात कारवाई करण्याचा विचार सुरु केला आहे.