Narendra Modi America Visit: भारताचे पंतप्रधान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदीचे व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत केले. तसेच, त्यांच्यासाठी शासकीय भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमधील केमिस्ट्री दिसून आली. दोन्ही नेत्यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी टोस्ट(चिअर्स) केले होते. यावेळी सर्वांच्या नजरा नरेंद्र मोदी यांच्या हातातील ड्रिंक्सवर होत्या.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, मद्याच्या ग्लासने टोस्ट केले जाते. पण, या दोन्ही नेत्यांच्या हातात असलेल्या ग्लासात मद्य नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. बायडेन म्हणाले, 'आम्हा दोघांसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही मद्यपान करत नाही.' यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, पीएम मोदी नेमकं काय पीत होते? तर, त्या पेयाला जिंजर एल(Ginger Ale) म्हणतात.
काय आहे Ginger Ale?जिंजर एल हे कार्बोनेटेड शीतपेय आहे. कार्बोनेटेड म्हणजे त्यात सोडा मिसळला जातो. हे सामान्य शीतपेयासारखेच आहे, फक्त त्यात अद्रकाचा फ्लेवर टाकला जातो. अनेकदा हे पेय थेट पिले जाते, तर काही लोक इतर पेयांमध्ये मिसळून पितात. यात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. पहिला नियमित किंवा गोल्डन आणि दुसरे ड्राय.