मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हॅटिकन येथे पोहचून पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पोप यांना जादू की झप्पी दिल्यानंतर विविध विषयांवर मोदींनी त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना कालावधी, सर्वसाधारण जागतिक विषयांवर चर्चा आणि विश्वशांती ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचेही निमंत्रण दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर इटलीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी राजधानी रोममधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. यानंतर मोदींचे भारतीय समुदायाने मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी काही महिलांनी संस्कृतमधून श्लोक म्हटले. विशेष म्हणजे, यावेळी नरेंद्र मोदींनी इटलीत वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या माही गुरुजींशी चक्क मराठीत आणि त्यानंतर एका महिलेने मोदींना 'केम छो...' म्हटल्यावर तिच्याशी गुजरातीमध्येही संवाद साधला.
नरेंद्र मोदींनी आज पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली, आपल्या फेसबुक आणि ट्विटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, संत पोप प्रांसिस यांच्यासमवेत उत्साहवर्धनक चांगली भेट झाली. मला त्यांच्यासमवेत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली, तर त्यांना भारतात येण्याचं निमंत्रणही दिलं, असे ट्विट मोदींनी केलं आहे. कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच बैठक आहे.
2013 मध्ये पोप बनल्यानंतर पहिलीच भेट
फ्रान्सिस यांनी 2013 मध्ये पोप बनल्यानंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांशी भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे, नरेंद्र मोदी हे पोप यांची भेट घेणारे पहिले भारतीय पीएम आहेत. वॅटीकेनमध्ये मोदींसमेवत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही मोदींसमवेत हजर होते. मोदींनी व्हॅटीकन सिटीचे परराष्ट्रमंत्री पिएत्रो पॅरोलिन यांच्यासमवतेही चर्चा केली.
इटलीमध्ये G20 शिखर परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत जी-2- परिषदेसाठी गेले आहेत. जी-20 ची बैठक गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलावी लागली. आता ही परिषद रोममध्ये होत आहे. G20 ला 'वर्ल्ड इकॉनॉमिक इंजिन' असेही म्हणतात. या गटाची ही आठवी बैठक असेल. पंतप्रधान 31 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत रोममध्ये असतील. त्यानंतर ग्लासगोला रवाना होतील.
इटलीवरुन ब्रिटनला जाणार
पंतप्रधान मोदी 31 ऑक्टोबरला इटलीहून ब्रिटनला रवाना होणार आहेत. येथे ते ग्लासगो, स्कॉटलंड येथे होणाऱ्या COP26 क्लायमेट चेंज समिटमध्ये भाग घेतील. हवामान बदलावरील ही 26वी शिखर परिषद आहे. ही इटली आणि ब्रिटन यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे. या परिषदेत 120 देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.