ऑनलाईन लोकमत
पॅरिस, दि. ३० - जागतिक हवामान परिषदेसाठी फ्रान्समध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरवरून दिली.
फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये जागतीक हवामान बदलाविषयी संमेलनात सहभागी होण्यासाठी मोदी शहरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांचीही भेट घेतली.
मोदी आणि शरीफ भेटीवर राजकीय नेत्यांमध्ये सकारात्मक भावना दिसून आल्या प्रत्येक स्तरावरु या भेटीबदल स्वागत केले जात आहे. भाजपाचे शत्रघ्न सिन्हा, शिवसेनेचे अरविंद सावंत. सिताराम येचुरे यांनी मोदी शरीफ भेटीस सकारात्मकता दर्शवली.
मोदी व शरीफ एकमेकांसमोर आल्यानंतर प्रथम हस्तांदोलन झाले. यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, भारतासोबत कोणत्याही अटीशिवाय चर्चा करू शकतो, असे शरीफ यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आजच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील चर्चा पुढे राहू शकते.