वॉशिंग्टन - चंद्रावर जाणारा पाहिला मानव म्हणून आपण नील आर्मस्ट्राँगला ओळखतो. त्यानंतरही काही शास्त्रज्ञांनी चंद्रावर पाय ठेवला. पण आतापर्यंत एकाही महिलेला चंद्रावर जाता आलेले नाही. मात्र आता नासाची अंतराळवीर जेसिका मीर ही चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरू शकते. जेसिका मीर ही आर्टेमिर चंद्र अभियानांतर्गत चंद्रावर जाईल. या अभियानामधून पहिली महिला म्हणून जेसिका मीर हिला चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी मिळू शकते. जेसिका मीर ही ज्यू आणि स्वीडिश नागरिक आहे. जेसिका १९७२ नंतर चंद्रावर जाणारी पहिली मानव ठरेल.
जेसिका यांची आई स्वीडिश होती आणि त्यांचे वडील इस्राईली होते. जेसिका हिच्यासाठी अंतराळ हे काही नवे नाही. त्यांनी २०१९ मध्ये पहिल्या फिमेस स्पेसवॉकमध्ये भाग घेऊन इतिहास रचला होता. जेसिका हिला तिच्या ज्यू आणि इस्राईली पार्श्वभूमीचा अभिमान बाळगते. त्यामुळेच ती आपल्यासोबत अंतराळात जाताना इस्राइलचा झेंडा आणि अन्य काही वस्तू नेल्या होत्या.
जेसिका मीरबाबतची ही घोषणा नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत अनेक अंतराळ मोहिमा आखल्या जाणार आहेत. आर्टेमिस हे नाव ग्रीसमधील एका देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ती अपोलोची जुळी बहीण होती. १९६० ते १९७० च्या दशकामध्ये नासाच्या अंतराळ अभियानांना नासाने अपोले हे नाव दिले होते.
महिलेने चंद्रावर पाऊल ठेवले नसले तरी आतापर्यंत अनेक महिलांनी अंतराळ यात्रा केली आहे. सोव्हिएट युनियनच्या कॉस्मोनॉट वेलेंतिना तेरेस्कोवा ही अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला ठरली होती. त्या १९६३ मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. मात्र अजूनही जगभरामध्ये महिला अंतराळवीरांची संख्या कमी आहे.