वॉशिंग्टन : अवघ्या ३९ दिवसांत मंगळावर मानव पाठविणारे यान तयार करण्यासाठी अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) टेक्सास येथील अॅड अॅस्ट्रा रॉकेट कंपनीला दहा दशलक्ष डॉलर्स अनुदान मंजूर केले आहे. ही कंपनी असे रॉकेट तयार करील की जे कधी बघण्यात आलेले नसेल, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रंकलीन चँग-डियाझ यांनी सांगितले. डियाझ हे माजी अंतराळवीर असून ते अंतराळातील सात मोहिमांमध्ये सहभागी झाले होते. तीन वर्षांत कंपनी इंजिन तयार करून अवकाशात उड्डाण करेपर्यंत नासा दहा दशलक्ष डॉलर्स देईल.
मंगळावर मानव पाठविण्यास नासा देणार अनुदान
By admin | Published: April 06, 2015 2:28 AM