शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

NASA Mars Mission: 'बिंदी' चमकली; मंगळावर यान उतरताच सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या डॉ. स्वाती मोहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 7:13 PM

Dr. Swati Mohan's bindi Photo Viral: शुक्रवारी नासाच्या या यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आणि एक आवाज आला 'टचडाउन कन्फर्म्ड', कोणत्याही मोठ्या मिशनच्या यशासाठी हे शब्द खूप मोलाचे असतात. तो आवाज होता डॉ. स्वाती यांचा. (NASA Mars 2020 Perseverance Rover Mission)

जगभरात सध्या भारतीयांचा डंका सुरु आहे. अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष ही भारतीय महिला, गुगलचे सीईओ भारतीय अशा मोठमोठ्या पदांवर भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. आता तर पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावलाच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी एक मूळच्या भारतीय महिलेने मंगळावर आपला आवाज पोहोचविला आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या वैज्ञानिक डॉ. स्वाती मोहन (Dr Swati Mohan) यांची सध्याच्या घडीला जगभरात चर्चा होत आहे. स्वाती यांनी भारतीय संस्कृतीचेही नाव जगभरातच नाही तर मंगळावरही कोरले आहे. (NASA Mars 2020 Perseverance Rover Mission Dr Swati Mohan)

 मंगळावर जीवन असण्याची शक्यता वाटत असल्याने अमेरिका, चीनसह भारतही मंगळावर मोहिम केली आहे. या साऱ्या देशांनी यान पाठविली आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे पर्सवियरेन्स रोवर मिशन (NASA Mars 2020 Perseverance Rover Mission) ला मंगळावरील आतापर्यंतचे सर्वात खतरनाक मिशन म्हटले जात आहे. 

नासाच्या यानाला मंगळ ग्रहावर लँड करण्यात अनिवासी भारतीय असलेल्या अमेरिकी शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांची भूमिका खूप महत्वाची ठरली आहे. शुक्रवारी नासाच्या या यानाने मंगळावर यशस्वी लँडिंग केले आणि एक आवाज आला 'टचडाउन कन्फर्म्ड', कोणत्याही मोठ्या मिशनच्या यशासाठी हे शब्द खूप मोलाचे असतात. तो आवाज होता डॉ. स्वाती यांचा. 

यानंतर लगेचच नासाने ट्विटरवर मिशनसंबंधीचे फोटो पोस्ट केले. यामध्ये एक फोटो डॉ. स्वाती यांचा देखील होता. त्या नासाच्या कंट्रोल रुममध्येच काम करत होत्या. पण हा फोटो यानाच्या वेगाने सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला. भारतीय ट्विटरातींनी त्यांना एकदम उचलून धरले, ते म्हणजे त्या एवढ्या मोठ्या पदावर असून, एवढी ख्याती कमावली असूनही अमेरिकेच्या नासामध्ये कपाळी टिकली लावून काम करतात. बास्, हीच बाब भारतीयांना भावली आणि त्यांच्या कर्तुत्वासोबतच भारतीय संस्कृतीचे नाव मंगळावर कोरल्याच्या आनंदात स्वाती यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षावही होऊ लागला. 

कोण आहेत स्वाती मोहन?स्वाती मोहन या एक वर्षाच्या असताना त्यांचे आई वडील अमेरिकेला स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण Northern Virginia आणि Washington DC मध्ये झाले. त्यांनी कॉर्नेल विश्वविद्यालय आणि नंतर मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून अंतराळ विज्ञानावर शिक्षण घेतले आहे. Star Trek हा टीव्ही शो त्यांनी 9 व्या वर्षी पाहिला होता, तेव्हापासून त्यांना अंतराळ क्षेत्र खुणावू लागले होते. त्यांनी मार्स 2020 मोहिमेचे दिशा-निर्देशन आणि नियंत्रण विभागाचे नेतृत्व केले. रोव्हरला उतरविण्यासाठी त्यांनी फ्लाईट कंट्रोलरची भूमिका निभावली, जी यान सुखरुपपणे जमिनीवर उतरवण्यासाठी जोखमीची असते.  

टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रहAmericaअमेरिकाIndiaभारत