शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 3:23 PM

NASA perseverance rover landing video : चार दिवसांआधी १९ फेब्रुवारीला मार्स मिशन (Mars Mission NASA) च्या अंतर्गत नासाचं पर्सीवरेंस रोवन (Perseverance Rover) पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर सात महिन्यांनी यशस्वीपणे मंगळ ग्रहावर लॅंड झालं होतं.

NASA perseverance rover landing video : अमेरिकन अंतराळ संस्था NASA ने मंगळ ग्रहावरील (Mars) चे ताज्या फुटेजचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नुकताच मंगळावर गेलेल्या नासाच्या पर्सीवरेंस रोवर (Perseverance Rover) ने मंगळावरून पाठवला आहे. या व्हिडीओत पर्सीवरेंस रोवरने पॅराशूटच्या मदतीने मंगळ ग्रहावरील लाल जमिनीवर लॅंड करण्याच्या (NASA Mars Perseverance Rover Landing Video) च्या एका एका क्षणाला कॅमेरात कैद केलं आहे.

नासाचं मिशन मंगळ

चार दिवसांआधी १९ फेब्रुवारीला मार्स मिशन (Mars Mission NASA) च्या अंतर्गत नासाचं पर्सीवरेंस रोवन (Perseverance Rover) पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर सात महिन्यांनी यशस्वीपणे मंगळ ग्रहावर लॅंड झालं होतं. जगभरातील वैज्ञानिकांचं लक्ष या लॅंडींगवर होतं. हा रोवर लाल ग्रहाच्या सर्वात धोकादायक क्षेत्रात जजेरो क्रेटरमध्ये उतरलं होतं. आता रोवरने मंगळ ग्रहाचा एक व्हिडीओ पाठवला आहे. ज्यात मंगळावरील पहिल्यांदाच हाय डेफिनेशन आवाज ऐकायला मिळत आहे.

२५ कॅमेरे असलेल्या पर्सीवरेंस रोवनने वेगवेगळ्या अॅंगलने मंगळावरील लाल जमिनीला कॅमेरात कैद केलंय. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा इतका जवळील व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. व्हिडीओ बघितल्यावर समजतं की, मंगळ ग्रहावरील जमीन ओबडधाबड आहे. जमिनीवर मोठमोठे खड्डे आहेत.

वाळवंटासारखा दिसतोय लाल ग्रह

मंगळ ग्रहाचा हा व्हिडीओ पाहून असं वाटतंय की जणू हा एखादा वाळवंट आहे. व्हिडीओत दिसतं की, जसजसा रोवर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर जातो, त्याच्या जेटने फेकल्या जात असलेल्या हवेमुळे जमिनीवरील माती हवेत उडत आहे. रोवर जमिनीपासून २० मीटर अंतरावर असतानाचा व्हिडीओ आहे. जमिनीवर पोहोचताच रोवरचे आठही चाके खुलू लागतात आणि काही सेकंदात रोवर मंगळ ग्रहावर लॅंड होतं.

मंगळ ग्रहावर जीवनाची शक्यता

दरम्यान पर्सीवरेंस रोवर मंगळ ग्रहावर कार्बनडायऑक्साइडपासून ऑक्सीजन बनवण्याचं काम करेल आणि मंगळ ग्रहावर पाण्याा शोध घेईल. सोबतच मंगळ ग्रहाच्या जमिनीखाली जीवनाचे पुरावे शोधेल. त्यासोबत मंगळ ग्रहावरील वातावरण आणि जलवायुचा अभ्यास करेल.

टॅग्स :Marsमंगळ ग्रहNASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स