शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

Anil Menon NASA: आधी स्पेस स्टेशन, चंद्र, तेथून मंगळावर जाणार; नासाकडून अनिल मेमन यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 10:41 PM

NASA picks Anil Menon for Astronaut: चांद्रमोहिमेच्या आधी दोन वर्षे या सर्वांना कठोर प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर या अंतराळवीरांना आधी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन, तेथून चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत. 

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा येत्या काही काळात चंद्रावर यान पाठविणार आहे. यावेळी पुन्हा एकदा मनुष्य पाठविण्यात येणार आहे. अंतराळवीर चंद्रावर आधीपेक्षा सर्वाधिक वेळ व्यतित करणार आहेत. तेथून ते मंगळ ग्रहावर लक्ष ठेवणार आहेत. नासाने यासाठी 10 अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय वंशाचे अंतराळ वीर डॉ. अनिल मेनन यांचे देखील नाव आहे. 

चांद्रमोहिमेच्या आधी दोन वर्षे या सर्वांना कठोर प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर या अंतराळवीरांना आधी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन, तेथून चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत. 

भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा जन्म युक्रेनमध्ये झाला. ते यूएस एअर फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून तैनात आहेत. NASA च्या SpaceX Demo-2 मोहिमेदरम्यान वैद्यकीय संस्था तयार करणारे ते पहिले SpaceX फ्लाइट सर्जन होते. डॉ मेनन यांना आधीच NASA मध्ये फ्लाइट सर्जन म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. अनिल मेनन, 45, हे इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन आहेत.

NASA प्रोफाइलनुसार, मेनन 2010 हैती भूकंप, 2015 नेपाळ भूकंप आणि 2011 रेनो एअर शो क्रॅश दरम्यान मदत केली होती. त्यांनी 1999 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून न्यूरोबायोलॉजीमध्ये बॅचलर पदवी आणि 2004 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 2009 मध्ये, त्यांनी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमधून डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी प्राप्त केली.

अफगाणिस्तानातही कामऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडमसाठी त्यांना अफगाणिस्तानात तैनात करण्यात आले होते. माउंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी हिमालयन रेस्क्यू असोसिएशनसाठीही काम केले. मेनन यांनी नंतर 173 व्या फायटर विंगमध्ये लष्करी कर्तव्यासाठी बदली करून केली आणि नंतर एरोस्पेस मेडिसिनमध्ये निवासी म्हणून काम केले. पायलट म्हणून त्यांना 1,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांची पत्नी अण्णा मेनन SpaceX मध्ये काम करतात आणि त्यांना दोन मुले आहेत.

टॅग्स :NASAनासा