केप कॅनाव्हरल : तब्बल नऊ वर्षांनंतर अमेरिकेच्या धरतीवरून होणाऱ्या ‘नासा’च्या पहिल्या अंतराळ उड्डाणाच्या एक आठवडाआधीच दोन अंतराळवीर केनेडी अंतराळ यान प्रक्षेपण केंद्रावर दाखल झाले आहेत. सरकारी मोहिमेऐवजी खाजगी कंपनी अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यिाविषयी ही पहिलीच वेळ आहे. अंतराळवीर डग हर्ले आणि बॉब बेकन यांना सोबत घेत स्पेस एक्सचे अंतराळयान एक आठवड्याने अंतराळी झेपावणार आहेत.अंतराळवीर डग हर्ले अािण बॉब बेकन हे अंतराळ संस्थेच्या विमानाने ह्युस्टनहून फ्लोरिडा येथे दाखल झाले आहेत.फ्लोरिडास्थित अंतराळयान प्रक्षेपणस्थळाहून अमेरिकन अंतराळवीर पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेवर जाणार असून नासा आणि अंतराळ कार्यक्रमासाठी हा अद्भुत क्षण आहे. आजपासून आठवडाभरात आम्ही अंतराळी भरारी घेऊत. आमच्यासाठी ही एक संधी तर आहेच, तसेच अमेरिकी जनता, स्पेस एक्स आणि नासासाठी आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो, असे अंतराळवीर हर्ले यांनी फ्लोरिडा येथे पोहोचल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पुढच्या बुधवारी दुपारी हे दोन्ही अंतराळवीर स्पेस फाल्कन ९ रॉकेटच्या साह्याने स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे रवाना होतील.
दहा वर्षांनंतर ‘नासा’ची पहिली अंतराळ मोहीम; दोन अंतराळवीरांसह ‘स्पेस एक्स’ झेपावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:17 AM