Nasrallah Dead Body Recovered: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शुक्रवारी (27 सप्टेंबर) हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृत्यू झाला होता. शनिवारी या घटनेची माहिती जगभर पसरली. दरम्यान, आता रविवारी(29 सप्टेंबर) त्याचा मृतदेह सापडला आहे. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळावरुनच त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे. पण, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भीषण बॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्या नसरल्लाहच्या शरीरावर वैद्यकीय पथकाला एकही जखम आढळली नाही.
संबंधित बातमी- 'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
नसराल्लाहचा मृत्यू कसा झाला?मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिजबुल्ला प्रमुखाचा मृतदेह व्यवस्थित स्थितीत सापडला आहे. त्याच्या शरीरावर एकही जखम आढळली नाही. मग आता प्रश्न पडतो की, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तर, नसरल्लाहचा मृत्यू बॉम्बच्या प्रचंड आवाजामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण हल्ल्यात नसराल्लाह याच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाले असून, फक्त त्याची अंगठी सापडल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र आता त्याचा मृतदेह सापडला आहे.
संबंधित बातमी-नसरल्लाहच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ बनला हिजबुल्लाचा प्रमुख
अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर इस्रायलला यश अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर आणि असंख्य गुप्तचर माहितीनंतर इस्रायलने भूमिगत बंकरवर अचूक हल्ला करुन नसराल्लाहचा खात्मा केला. हा बंकर दक्षिण बेरूतमधील एका व्यस्त रस्त्याच्या खाली 60 फूट खाली होता. या हवाई हल्ल्यात 6 इमारतींना निशाणा बनवण्यात आले होते. या हल्ल्यात नसरल्लाहशिवाय, मिसाइल युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा सहकारी हुसेन अहमद इस्माईलसह नसरल्लाहची मुलगी जैनबदेखील या हल्ल्यात ठार झाली आहे.