शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरुद्ध नाटोच्या धर्तीवर 'क्वाड' चालणार, अमेरिकेनं केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 7:59 AM

आम्हाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले हितसंबंध सहकार्यातून वाढवायचे आहेत.  क्वाडकडे नैसर्गिकरीत्या भागीदार देशांची संघटना म्हणून पाहिले पाहिजे.

दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वात नाटोने (उत्तर अटलांटिक ट्रीटी संघटना) ज्या मार्गाने कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या विरोधात अमेरिकेचे नेतृत्व केले, त्याच धर्तीवर आता चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरुद्ध अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 'क्वाड' (क्वाड्रिलेटरल सिक्योरिटी डायलाग) ही आघाडी ठोस आकार घेऊ लागली आहे.क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये आता साप्ताहिकरीत्या चर्चा होत आहे. ज्यात दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि न्यूझीलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उच्च अधिका-यांसह सुरुवातीच्या चार देशांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, क्वाडच्या चारही देशांचे परराष्ट्र मंत्री लवकरच नवी दिल्लीत बैठक घेण्याच्या तयारीत आहेत. यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम येथे झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टीफन बीगन यांनी ही सर्व माहिती दिली. बीगन यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की, क्वाड हे केवळ चीनविरुद्ध आघाडी म्हणूनच स्थापन केलेले नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं क्वाडची तुलना नाटोशी केल्यानं सर्व रणनीती स्पष्टपणे दर्शवते. अशा कोणत्याही युतीचा अधिक व्यापक सकारात्मक अजेंडा असावा, परंतु त्याच वेळी ते म्हणाले की, नाटो ज्या पद्धतीने केवळ 12 देशांनी सुरू केली, परंतु नंतर ती 27 देशांची झाली. त्याच प्रकारे, क्वाड देखील सुरू केले जाऊ शकते, परंतु त्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर प्रदेशांतील देशांचा देखील समावेश असू शकतो. त्यांनी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि न्यूझीलंडच्या परराष्ट्र सचिवांमधील साप्ताहिक चर्चेचा खुलासा केला. ते म्हणाले की, एक अतिशय चांगला संवाद आहे आणि आम्हाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आपले हितसंबंध सहकार्यातून वाढवायचे आहेत.  क्वाडकडे नैसर्गिकरीत्या भागीदार देशांची संघटना म्हणून पाहिले पाहिजे.अमेरिकेच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनीही खुलासा केला आहे की, 'क्वाडची पुढील मंत्रिमंडळ बैठक लवकरच नवी दिल्लीत होणार आहे. मला विश्वास आहे की, क्वाड ही संकल्पना भारताला इंडो-पॅसिफिक आणि त्याही पलीकडे भरारी घेण्यास मदत करेल. भारत हा आमचा मित्र आहे हे आमच्या हिताचे आहे. हे उल्लेखनीय आहे की क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सप्टेंबर 2019मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली होती. जरी क्वाडची स्थापना 2007 मध्ये झाली होती, परंतु चार देशांनी 2016पासूनच याकडे नव्याने पाहण्यास सुरुवात केली आहे.आता पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे, तर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्ली येथे होणारी भेट ही चीनसाठी एक मोठी रणनीतिक व मुत्सद्दी संकेत असेल. क्वाडच्या तीन सदस्य देशांनी (भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया) चीनच्या पुरवठा साखळीला मंगळवारी ज्या पद्धतीने पर्याय दिला आहे, त्यावरून चीनवरही आर्थिक दबाव आणला जाईल, असे ते म्हणत आहेत. भारत, जपान आणि अमेरिका यांच्यातील लष्करी अभ्यासामध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्याची घोषणाही लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जो विजय मिळवितो, त्याला एक मोठी पसंती असेल, असेही बीगन यांनी नमूद केले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प