शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

लोकशाहीची मूल्यं ही देशाचा आत्मा, त्यापेक्षा सत्ता अहंकार मोठा नाही याचं राज्यकर्त्यांनी भान ठेवावं : रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 2:28 PM

लोकशाहीच्या निर्देशांकात भारताची झाली ५३ व्या स्थानी घसरण

ठळक मुद्देलोकशाहीच्या निर्देशांकात भारताची झाली ५३ व्या स्थानी घसरणनॉर्वेला देण्यात आलं पहिलं स्थान

जगातील सर्वात मोठी आणि बळकट लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही निर्देशांत्या २०२० च्या सूचीत ५३ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारताची या यादीत दोन क्रमांकानं घसरण झाली. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटनं (इआययू) २०२० च्या लोकशाही निर्देशांकाची जागतिक क्रमवारी नुकतीच जाहीर केली. लोकशाहीच्या मूल्यांकडे पाठ फिरवणं आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याविरोधात कारवाईंमुळे भारताची या क्रमवारीत घसरण झाल्याचं इआययूनं आपल्या 'डेमोक्रसी इन सिकनेस अँड इन हेल्थ' या अहवलातून म्हटलं आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावरून टीका केली आहे."इआययूच्या लोकशाही निर्देशांकात आपल्या देशाची कामगिरी दरवर्षी खालावत असून २०१४ मध्ये असलेलं २७ वं स्थान २०२० मध्ये ५३ पर्यंत घसरलंय. हे नागरिकांसाठी घातक आहे. लोकशाही मूल्ये हा भारताचा आत्मा असून लोकशाही मूल्यांपेक्षा सत्ता आणि अहंकार मोठा नाही याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवं," असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर आपली प्रतिक्रिया दिली. काय म्हटलंय अहवालात?भारताचा शेजारी राष्ट्रांपेक्षा क्रमांक वरचा असला तरी भारताला २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कमी गुण मिळाले आहेत. २०१९ मध्ये भारताला ६.९ तर २०२० मध्ये भारताला ६.६१ गुण मिळाले. भारतात सध्या मोठं दडपण असल्याचं सांगत भारताची कामगिरी खालावल्याचं अहवालातून सांगण्यात आलं आहे. यामध्ये तब्बल १६७ देशांचा सहभाग करण्यात आला असून २३ देशांमध्ये पूर्ण लोकशआही, ५२ देश सदोष लोकशाही, ३५ देश मिश्र सत्तेत तक ५७ देशांचं हुकुमशाही या श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. अमेरिका, ब्राझील, बेल्जिअम आणि फ्रान्स या देशांसोबत भारताचा समावेश सदोष लोकशाही श्रेणीत करण्यात आला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर नॉर्वे, नंतर आइसलँड, स्वीडन, न्यूझीलंड, कॅनडा, फिनलंड, डेन्मार्क, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड या देशांचा पहिल्या दहामध्ये समावेश होतो. तर या यादीत उत्तर कोरियाला शेवटचं म्हणजेच १६७ वं स्थान देण्यात आलं आहे. 

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीdemocracyलोकशाहीNew Zealandन्यूझीलंडAmericaअमेरिकाBrazilब्राझीलFranceफ्रान्स