मॉस्को : देशात कोरोनाचे रुग्ण कमी झालेले असताना शेजारील रशियामध्ये (Russia) कोरोनाने कहर केला आहे. शनिवारी रशियात कोरोनामुळे 1002 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही मृत्यूंची संख्या कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनची सर्वोच्च आहे. रशियात कोरोना रुग्णांची (CoronaVirus) संख्याही वेगाने वाढू लागला आहे.
रशियात गेल्या २४ तासांत 33,208 नवे रुग्ण सापडत आहेत. तिथे आजवर 2,22,315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशिया जगभरात कोरोना लस स्पुतनिक व्ही ही पुरवत आहे. महत्वाचे म्हणजे रशियाने जगातील पहिली कोरोना लस लाँच केली होती. या लसीचे परिणाम किंवा तिची चाचणीदेखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आली नव्हती. स्पुतनिक व्ही लसीला भारताने ही परवानगी दिली असून अनेक ठिकाणी ही लस दिली जात आहे.
रशियाच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सनुसार देशात आजवर 79 लाख नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. रशिया हा सर्वाधिक कोरोना बाधित देशांमध्ये ५ वा देश आहे. रशियन लोक कोरोना लस घेत नाहीएत यामुळे कोरोनामुळे मरणाऱ्याची संख्या वाढत चालल्याचा आरोप रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने केला आहे.
रशियामध्ये कोरोना लसीकरण मोहिम धिमी झाली आहे. रशियन लोकांचाच आपल्या देशाने बनविलेल्या कोरोना लसीवर विश्वास नाहीय. त्यांना कोणत्याही नवीन मेडिकल उत्पादनाबाबत भीती वाटते. जगभरात कोरोनाचे 24 कोटी रुग्ण झाले आहेत. तर 48.8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगात 6.58 अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे.