ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २१ - मधेशी लोकांच्या बरेच दिवस सुरु असलेल्या आंदोलनानंतर राज्यघटनेत सुधारणा करण्यास नेपाळ सरकार तयार झाले आहे.
नेपाळच्या सरकारने रविवारी रात्री कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक घेऊन राज्यघटनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आंदोलन करणा-या नेत्यांचाही समावेश होता. मधेशींच्या मागणीनुसार येत्या तीन महिन्यात सीमेवरील प्रातांची पुन:निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यघटना सुधारणेबाबत नवीन मसुदा मंत्रीमंडळाकडून नेपाळच्या संसदेत मांडण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचे भारतकडून स्वागत करण्यात आले आहे.
नेपाऴमध्ये नवीन राज्यघटना तयार करण्यात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात यावेत, अशी मागणी करत येथील भारतीय वंशाचे मधेशी गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत.