शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

Nepal Helicopter Crash धक्कादायक! नेपाळमध्ये मोठी दुर्घटना, नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 5:38 PM

Nepal Helicopter Crash: हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्तात समोर आले आहे.

Nepal Helicopter Crash: नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील शिवपुरी येथे हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर एअर डायनेस्टीचे आहे. हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताबाबत पोलीस अधिकारी शांती राज कोईराला यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर शिवपुरी-७ जवळ कोसळले आहे. हेलिकॉप्टर सूर्यचौर टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्तात समोर आले आहे.

या दुर्घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकही मोठ्या संख्येने दाखल झाले. पोलिसांनी सांगितले की, एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर रसुवाच्या स्याफ्रुबेसी येथे गेले होते. अपघातानंतर हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी आग लागली. बचावकार्य सुरू आहे. उड्डाणानंतर अवघ्या 3 मिनिटांतच हेलिकॉप्टरशी संपर्क तुटल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण ५ जण होते. या अपघाताबाबत त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळानेही निवेदन जारी केले आहे. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टर उडवत असल्याचे सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी त्रिभुवन विमानतळाच्या पूर्व भागात सौरी एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर हा अपघात झाला. या अपघाताचे कारण विमान धावपट्टीवर घसरल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विमान जमिनीवर आदळले आणि आग लागली. याआधी १९९२ मध्ये याच विमानतळावर मोठा अपघात झाला होता, ज्यामध्ये १६७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :NepalनेपाळHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाAccidentअपघातDeathमृत्यू