काठमांडू: भारत सरकारनं विरोध केल्यानंतरही नेपाळ सरकारनं नवा राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला आहे. या नकाशातून नेपाळनं लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरामधल्या एकूण ३९५ चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर दावा सांगितला आहे. हा संपूर्ण भाग भारतीय हद्दीत येतो. नेपाळच्या भू व्यवस्थापन आणि सुधारणा मंत्री पद्मा अरयाल यांनी सरकारच्या वतीनं नवा नकाशा प्रसिद्ध केला. नवा नकाशा प्रसिद्ध करुन लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपल्या भागात दाखवू, अशी घोषणा नेपाळ सरकारनं आधी केली होती. त्यानंतर आज नेपाळनं नवा नकाशा जारी केला. आता सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळांमध्ये या नकाशाचा वापर केला जाईल. नवा नकाशा लवकरच संसदेसमोर ठेवला जाईल आणि त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती अरयाल यांनी दिली. नेपाळनं नव्या नकाशात ३९५ चौरस किलोमीटरच्या भूभागाची भर घातली आहे. लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी सोबतच गुंजी, नाभी आणि कुटी गावांवरही नेपाळनं दावा सांगितला आहे. नेपाळनं नव्या नकाशात कालापानीतल्या ६० किलोमीटर भागावर दावा केला आहे. यासोबतच लिंपियाधुरामधल्या ३३५ किलोमीटर भागही नकाशात दाखवला आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं या नकाशाला काल मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत मंजूर झालेला नकाशा नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आला. 'लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी भाग नेपाळमध्ये येतात. त्यांचा नेपाळमध्ये समावेश समावेश करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात येतील. त्यासाठी कुटनितीचा आधारही घेण्यात येईल,' असं राष्ट्रपती म्हणाल्या. कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख भाग आमचे असून ते परत घेणारच, अशी भूमिका नेपाळच्या पंतप्रधानांनी काल मांडली.कोरोनानंतर 'अम्फान' घालणार 'थैमान'? जम्मू-काश्मीर ते तामिळनाडू, 'या' राज्यांना 'अलर्ट' जारी"काँग्रेस पाठवतंय राजस्थान सरकारच्या बसेस, आम्हाला आवश्यकता नाही", योगी सरकार अन् काँग्रेसमध्ये जुंपली...असल्या राजकारणाची काय गरज? बस प्रकरणावरून काँग्रेसच्या बंडखोर आमदाराचा पक्षाला घरचा अहेर
'तो' भाग आमचाच! नेपाळकडून नवा नकाशा प्रसिद्ध; भारताच्या ३९५ चौरस किलोमीटर प्रदेशावर दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 4:53 PM