शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

युद्धादरम्यान नेतन्याहू अचानक गाझात पोहोचले; ओलिसांच्या सुटकेसाठी दिली 38 कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:23 IST

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

Israel and Hamas War:इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. या दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांचे संरक्षण मंत्री इस्रायल कौट्स यांच्यासोबत गाझाला भेट दिली. दोघेही गाझा येथील अज्ञात ठिकाणी पोहोचले. त्यांनी ओलीसांची सुटका करून या भागातून बाहेर काढण्यासाठी पॅलेस्टिनींना आर्थिक बक्षीस जाहीर केले आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रत्येक ओलीसासाठी 5 मिलियन डॉलर्स (सुमारे 38 कोटी रुपये) बक्षीस देण्याचे वचन दिले आहे. ते म्हणाले, "ज्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे आहे, त्यांनाही मी सांगतो, जो कोणी बंधकांची सुटका करेल, त्याच्या कुटुंबीयांना या भागातून सुरक्षितरित्या बाहेर काढले जाईल." 

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला करून 1200 लोकांना ठार केले होते, तर 250 लोकांना ओलीस ठेवले होते. त्यांपैकी काहींना दोन लहान युद्धविरामांतर्गत सशर्त मुक्त करण्यात आले, परंतु अनेक हल्ल्यांमध्ये मारले गेले. जवळपास 100 ओलीस अजूनही हमासच्या कैदेत आहेत. त्यांची सुटका व्हावी यासाठी सातत्याने निदर्शने केली जात आहेत. 

हजारो पॅलेस्टिनी ठारइस्रायलच्या हल्ल्यात गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सुमारे 44 हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. हे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. हा नरसंहार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. दुसरीकडे इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धही सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 3400 लोक मारले गेले आहेत.

ताज्या हल्ल्यात इस्रायली लष्कराने मध्य बेरूतला दोन क्षेपणास्त्रे डागली, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 18 जण जखमी झाले. लेबनीजच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण लेबनीज सरकारच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ आहे. दुसरा हल्ला पश्चिम आशियातील इमारतीजवळ झाला, जेथे संयुक्त राष्ट्रांचे सामाजिक आणि आर्थिक आयोग आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsraelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू