नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीने (Labor Party) पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या लिबरल पार्टीचा पराभव करत जबरदस्त विजय मिळवला आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झाला आहे. मॉरिसन यांच्या पराभवानंतर, आता विरोधी पक्ष नेते अँथनी अल्बनीज ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान होतील. यातच, अँथनी अल्बनीज यांचा एक फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियाव जबरदस्त व्हायरल होत आहे. यात त्यांनी आपल्या खांद्यावर भगवा गमछा घेतल्याचे दिसत आहे.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, हे आहेत ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान, ज्यांनी विजयासाठी हाती भगवा घेतला आहे, असे म्हटले जात आहे. खरे तर, ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अनेक कार्यक्रमांत खांद्यावर 'ॐ' लिहिलेला गमछा घेताना दिसून आले आहेत. यामुळे, या भगव्या गमछाकडे त्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.
भारतासोबत खास संबंध - अँथनी अल्बनीज हे ऑस्ट्रेलीया-चीन संबंध संतुलित करू शकतात. तसेच त्यांचे भारतासोबतही चांगले संबंध आहेत. ते भारत आणि ऑस्ट्रेलिया संबंधांचा एका नव्या ऊंचीवर घेऊन जाऊ शकतात.
12 वर्षांचे असतानाच राजकीय आंदोलनात सहभाग -ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी यांचे जीवन हालाखीच्या परिस्थितीतच गेले. ते एकुलते एक होते. सिंगल आईनेच त्यांना लहानाचे मोठे केले. त्यांना, लहान पणीच त्यांच्या वडिलांचा एका कार अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, त्यांनी केवळ 12 वर्षांचे असतानाच राजकीय आंदोलनात सहभाग घेतला होता.