लंडन : युरोपीय संघातून अलग होण्यास तीन महिने मुदतवाढ (३१ ऑक्टोबर) देण्यासंबंधी ब्रिटिश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी विनास्वाक्षरीचे पत्र युरोपियन संघाला पाठविल्याने बे्रक्झिट करारावरुन नव्याने कोंडी निर्माण झाली आहे.
शनिवारी संसदेच्या अधिवेशानात नवा ब्रेक्झिट करार लांबणीवर टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांना कायद्यानुसार मुदतवाढीसाठी पत्र जारी करणे बाध्य आहे. त्यांनी हट्टी मुलासारखा व्यवहार करून विनस्वाक्षरीचे पत्र पाठविले. त्यांना संसद व न्यायालयाचा अवमाननेला सामोरे जावे लागले, असा इशारा विरोधी पक्षाने दिला. युरोपीय संघापासून विभक्त होण्याची अंतिम मुदत चुकविण्याऐवजी मुदतीत युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्धार जॉन्सस यांनी केला होता. शनिवारी ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बे्रक्झिट करार लांबणीवर टाकण्याच्या बाजूने कौल दिल्यावर जॉन्सस यांनी वाटाघाटी करणार नसल्याचे घोषित केले.