शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 9:29 AM

Coronavirus In India : भारतात आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णसंख्येत १३ टक्क्यांची घट. जागतिक आरोग्य संघटनेनुसार यानंतरही संसर्गाचं प्रमाण जगात सर्वाधिक.

ठळक मुद्देभारतात आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णसंख्येत १३ टक्क्यांची घट. जागतिक आरोग्य संघटनेनुसार यानंतरही संसर्गाचं प्रमाण जगात सर्वाधिक.

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. सध्या देशात काहीशा प्रमाणात रुग्णसंख्या आता कमी होताना दिसत आहे. भारतात गेल्या एका आठवड्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. परंतु संसर्गाची नवीन प्रकरणे अद्यापही भारतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहेत, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. जगभरात ज्या ठिकाणी ४८ लाखांपेक्षा थोडे अधिक नवे रुग्ण समोर आलेत आणि मृत्यूंची संख्याही ८६ हजारांपेक्षा थोडी कमी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १२ टक्के आणि पाच प्रतितास इतकं आहे. सर्वाधिक प्रकरणं ही भारतातून समोर आली आहे. परंतु गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये १३ टक्क्यांची घट झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यानंतर ब्राझिलमधून सर्वाधिक प्रकरणं समोर आली असून यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली, तर अमेरिकेतील नव्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांची घसरण तर अर्जेंटिनातील नव्या प्रकरणांमध्ये ८ टक्क्यांची आणि कोलंबियातील प्रकरणांमध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. मृतांच्या आकडेवारीतही भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून आलं. भारतात नव्या २७,९२२ नोंदी झाल्या. प्रति एक लाख लोकांमागे नव्या दोन लोकांचा मृत्यू होत असून हे प्रमाण चार टक्के इतकं असल्याचं समोर आलं आहे.  यानंतर नेपाळ आणि इंडोनेशियामध्ये हे प्रमाण अधिक आहे. तरी दुसरीकडे इंडोनेशियामध्ये हे प्रमाण पाच टक्क्यांनी घटलं आहे. भारतात सर्वाधिक नव्या प्रकरणांची नोंदजागतिक आरोग्य संघटनेद्वारे राष्ट्रीय अधिकाऱ्यांकडे ९ मे पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक २७,३८,९५७ नव्या प्रकरणांची नोंद झाली. ही त्या पूर्वीच्या आठवड्यापेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. WHO च्या अंदाजानुसार भारतात कोरोनाची एकूण प्रकरणं २.४६ कोटी आहेत आणि एकूण मृत्यूंची संख्या २,७०,२८४ इतकी आहे. 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्याIndonesiaइंडोनेशियाAmericaअमेरिकाBrazilब्राझील