पेइचिंग - जगभरातील सर्व देश हे कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने अनेक देशात थैमान घातले आहे. रुग्णांच्या आकडा हा सातत्याने वाढत असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रगत देशांमध्ये ही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला असून तब्बल 18,731,900 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 11,944,244 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र याच दरम्यान एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या संसर्गाचा धोका असतानाच आता चीनमध्ये आणखी एका व्हायरसचं इन्फेक्शन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नव्या इन्फेक्शनमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 60 जणांना त्याची लागण झाली आहे. चीनच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, लोकांमध्ये याचं संक्रमण वेगाने होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याआधी चीनच्या जियांग्सू प्रांतात या वर्षाच्या सुरुवातीला एसएफटीएस व्हायरसमुळे 37 हून अधिक लोक संक्रमित झाले होते.
जियांग्सूची राजधानी असलेल्या नानजियांगमध्ये एका महिलेला सुरुवातीला खोकला आणि ताप अशी काही लक्षणं आढळून आली. उपचारासाठी डॉक्टरकडे गेले असता महिलेच्या शरिरात ल्यूकोसाइट आणि प्लेटलेट कमी झाल्याची माहिती मिळाली. एका महिना तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतर तिची प्रकृती सुधारली आणि रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या इन्फेक्शनने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
रिपोर्टनुसार, अन्हुई आणि चीनच्या झेजियांग प्रांतात या व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. एसएफटीएस हा व्हायरसबाबत चीनमध्ये 2011 मध्ये माहिती मिळाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तर दुसरीकडे जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात दर 15 सेकंदाला कोरोनामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा वेग वाढला असून धडकी भरवणारी आकडेवारी मिळत आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मॅक्सिको या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. जगभरात दर 24 तासांत तब्बल 5900 लोकांचा मृत्यू होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू
धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, दु:खी झालेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी
Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"
Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट
Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका