शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
3
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
4
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
5
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
6
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
7
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
8
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
9
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
10
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
11
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
12
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
13
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
15
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
16
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
17
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
18
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
19
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
20
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

नवेल्या आईचा गोड सहारा.. वन मन्थ सीट ! चीनमधील पारंपरिक पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 6:33 AM

काहींना ही पद्धत अगदीच नवखी वाटली. कोणाला ती अजिबात पटली नाही तर कोणाला ती फारच छान वाटली.

बाळ जन्माला आलं की आई झालेल्या स्त्रीला अपार आनंद होतो. दवाखान्यात असेपर्यंत सर्व ठीक वाटतं.  पण एकदा का बाळाला घेऊन घरी आलं की मात्र आई झालेली स्त्री घाबरते. त्यात घरी आई, सासू किंवा आणखी कोणी मोठं आणि जाणतं माणूस असेल तर ताण थोडा तरी हलका होतो; पण यातलं जर कोणीच मदतीला नसेल तर मात्र बाळाची आई गांगरून जाते. अशी परिस्थिती आल्यास काय करायचं, असा प्रश्न जगभरातल्या अनेक बायकांना पडतो तसाच तो अमेरिकन असलेल्या पण सध्या हाँगकाँगमध्ये राहणऱ्या अनास्तासिया क्राॅस हिलाही पडला. मात्र, तिला तिच्या या अडचणीत चीनमधील पारंपरिक पद्धतीने मदत केली. ‘चायनीज वन मन्थ सीट’ ही ती परंपरा.

अनास्तासिया कॉसचा जन्म अमेरिकेतील पेनिसिल्वानिया येथे झाला. मात्र, ती लहानाची मोठी झाली न्यूयाॅर्कमध्ये. गायक आणि लेखक ही तिची ओळख. २०१६ पासून अनास्तासिया आपल्या चीनी नवऱ्याबरोबर चीनमधील हाँगकाँग शहरात स्थायिक झाली. चीनमध्ये बोलली जाणारी भाषा तिला पहिल्यापासून आवडत असल्याने ती भाषा ती शिकली. भाषा शिकता शिकता चीनमधील संस्कृती तिला कळत गेली. हाँगकाँग आणि मेनलॅण्ड चायना या दोन शहरात तिचा वावर जास्त होता. अनास्तासिया चीनमधीला आपल्या अनुभवावर समाजमाध्यमावर कायम लिहायची, आपले अनुभव वर्णन करायची. ती कुठे राहते, काय करते यासारखे सगळे तपशील ती द्यायची. असाच एकदा तिने बाळांतपणानंतरच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं.

‘चायनीज वन मन्थ सीट’ या पद्धतीचा आपल्याला कसा फायदा झाला याचं वर्णन केलं. त्यावर तिला लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींना ही पद्धत अगदीच नवखी वाटली. कोणाला ती अजिबात पटली नाही तर कोणाला ती फारच छान वाटली. २०२१ मध्ये अनास्तासिया नवऱ्यासोबत हाँगकाँगला राहायला आली. त्याचदरम्यान तिला मातृत्वाची चाहूल लागली. नऊ महिने व्यवस्थित काळजी घेतल्याने तिचे बाळंतपण सुखरूप झाले. गोंडस मुलीला घेऊन ती घरी आली. मातृत्वाची चाहूल लागली त्यावेळीच बाळंतपणानंतर लगेचच घरी ‘महिनाभरासाठी पूर्णवेळ नर्स’ नेमण्याचा निर्णय दोघांनी घेतलेला होता. कारण बाळंतपणानंतर घरात दुसरं कोणीच मदतीला नसणार याचा अंदाज त्यांना होता. ओळखीच्यांची, नातेवाइकांची मदत घेणंही त्यांना परवडणारं नव्हतं. अनास्तासियाचा नवरा चीनचा असल्याने त्याला चीनमधील ‘वन मन्थ सीट’ ही परंपरा माहिती होती. त्याचे फायदेही त्याला माहिती होते. त्याने अनास्तासिया सोबत चर्चा करून बाळंतपणानंतरच्या मदतीसाठी हा पर्याय निवडला. अनास्तासियालाही तो पटला. त्याबद्दलची माहिती जमवायला तिने सुरुवात केली. ओळखीच्यांचे अनुभव जाणून घेतले. 

जसजशी ती या विषयाची माहिती घेत होती तसतसे तिला याचे फायदे जाणवू लागले. तिची उत्सुकता वाढू लागली, लगेचच नर्सचा शोध सुरू झाला. अनेकींच्या मुलाखती घेऊन झाल्या. हाँगकाँगमध्ये बाळंतपणानंतर नर्ससेवा देणाऱ्या अनेक एजन्सी कार्यरत आहेत. या नर्सेसना सखोल प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्याकडून मिळालेल्या पर्यायांपैकी एक नर्स निश्चित करण्यात आली. ती जेव्हा दवाखान्यातून बाळासोबत घरी आली तेव्हा काही तासांतच महिनाभराच्या मुक्कामासाठी नर्स त्यांच्या घरी आली. नर्सने अनास्तासियाला बाळाला पाजायचे कसे, घ्यायचे कसे, दूध अधिक येण्यासाठी काय करायचे या सगळ्या गोष्टी शिकविल्या, शिवाय तिने दररोजचा चहा, नाश्ता, स्वयंपाक, इतर घरकामं ही आघाडीही एकटीने सांभाळली. त्यामुळे अनास्तासियाला या काळात पूर्ण विश्रांती मिळाली.  तिला बाळाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालविता आला. अनोळखी बाईसोबत आपण कसे राहणार? ही चिंता सुरुवातीला असलेल्या अनास्तासियाची नर्सशी चांगली गट्टी जमली. मग तिने नर्सची ही सेवा आणखी एक महिना वाढवून घेतली. या काळात नर्सने अनास्तासियाला बाळाची काळजी घेण्याबाबत बारीक बारीक गोष्टी समजावून सांगितल्या. तिला दिवसातून चार वेळा पौष्टिक आहार दिला, घरातल्या इतर जबाबदाऱ्या निभावल्या. 

नर्सची निवड करताना..चायनीज वन मन्थ सीटसाठी नर्सची निवड करणं हा फार महत्त्वाचा भाग. मुलाखतीतून ज्या नर्सची निवड केली जाते तिला घरी बोलावून, तिच्यासोबत पुरेसा वेळ घालवून  व्यवस्थित ओळख करून घेतली जाते. बाळंतपणाची तारीख, आपल्या आवडीनिवडी, घरातल्या सोयीसुविधा याची माहिती बारकाईने दिली जाते. त्यामुळे नर्सला माणसांचा, घराचा, आपल्याला काय पद्धतीने काम करावं लागेल याचा अंदाज येतो.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी