शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सेकंदांत पाणी शुद्ध करणारा नवा पॉलीमर

By admin | Published: December 27, 2015 12:30 AM

शास्त्रज्ञांनी काही सेकंदांत पाणी शुद्ध करू शकणारे नवे पॉलीमर विकसित केले आहे. विशेष म्हणजे या पॉलीमरचा अनेकदा पुनर्वापरही करता येतो.

न्यूयॉर्क : शास्त्रज्ञांनी काही सेकंदांत पाणी शुद्ध करू शकणारे नवे पॉलीमर विकसित केले आहे. विशेष म्हणजे या पॉलीमरचा अनेकदा पुनर्वापरही करता येतो. घरातील एअर फ्रेशनर ज्याप्रमाणे हवेतील दूषित घटक शोषून हवा ताजी करतो अगदी त्याचप्रमाणे हे पॉलीमर वाहत्या पाण्यातील घाण शोषून पाणी स्वच्छ करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही एअर फ्रेशनरमध्ये वापरण्यात येणाराच सायक्लोडेक्सट्रिन हा पदार्थ वापरण्यात आला आहे. अमेरिकेच्या कोर्नेल विद्यापीठाचे सहयोगी प्रोफेसर विल डिचेल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सायक्लोडेक्सट्रिनचा सछिद्र अवतार तयार केला आहे. सायक्लोडेक्सट्रिनच्या या अवतारात पारंपरिकरीत्या वापरण्यात येणाऱ्या सक्रिय कार्बनच्या तुलनेत प्रदूषकांना शोषून घेण्याची क्षमता काही बाबतीत २०० पटींहून अधिक दिसून आली. सायक्लोडेक्सट्रिनच्या जुन्या पॉलीमरच्या तुलनेत सक्रिय कार्बनचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ तर जास्त असते; परंतु जेवढ्या शक्तीने सायक्लोडेक्सट्रिन प्रदूषकांना बांधून ठेवू शकतो, तेवढी शक्ती सक्रिय कार्बन दाखवू शकत नाहीत.डिचेल म्हणाले की, हे पदार्थ वाहत्या पाण्यातून काही सेकंदांतच प्रदूषणकारी घटक नष्ट करतील. सायक्लोडेक्सट्रिनयुक्त पॉलीमरचे फेरउत्पादन सहज आणि किफायतशीररीत्या केले जाऊ शकते.या पॉलीमरचा कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा वापर करता येऊ शकतो आणि तरीही त्याच्या कामगिरीत थोडीही घट होत नाही. नव्या पॉलीमरबाबतचे हे निष्कर्ष नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.