जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 16 कोटींचा आकडा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
कोरोनावर मात केल्यानंतरही रुग्णाच्या शरीरात काही साईड इफेक्ट्स हे पाहायला मिळत आहेत. यामध्ये आता जीभेला सूज येत असल्याचं समोर आलं आहे. फ्लोरिडा येथे राहणाऱ्या अँथोनी यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली. त्यांनी कोरोनावर मात देखील केली पण त्यानंतरही त्यांच्या जीभेला सूज आली. ती सूज एवढी वाढली की जीभ बाहेर लटकायला लागली. जीभेला सूज येण्याच्या समस्येला Macroglossia असं म्हणतात. यामध्ये जीभेला सूज येते आणि तिचा आकार देखील वाढू लागतो. कोरोनावर रिसर्च करणारे डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे याच्या 9 केसेस आल्याचं म्हटलं आहे.
डॉ. जेम्स मेलविल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारानंतर त्याची जीभ इतकी सुजली की त्याला खाणं-पिणं आणि बोलणंही शक्य होत नाही. तसेच ती बाहेर आली आहे. ड़ॉक्टरांनी सर्जरी करून ती नॉर्मल साईज एवढी केली आहे. कोरोना औषधांच्या साईड इफेक्टमुळे हे होत असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो" असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी याबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सभासद असलेल्या 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.
धोका वाढला! "जगात कोरोनापेक्षाही अधिक घातक व्हायरस येऊ शकतो"; WHO प्रमुखांचा गंभीर इशारा
जगभरात अद्याप ही भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. वेगाने कोरोनाची लसीकरण केल्यानंतरही आजाराचा धोका संपणार नाही अशा गंभीर इशारा देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आणि त्याच्या नवनवीन व्हेरिएंटचा प्रसार होत आहे अशा वेळी कोणतीही खबरदारींबाबत शिथिलता बाळगणे चुकीचे ठरू शकते. संपूर्ण जग अखेरच्या महासाथीच्या आजाराचा सामना करत नाही. तर कोरोनाच्या तुलनेत आणखी घातक आणि संसर्गजन्य असलेल्या व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. टेड्रोस यांनी कोरोना लसीचा साठा करणाऱ्या देशांनाही यावेळी सुनावले. त्यांनी म्हटले की, लशीच्या वितरणात जगभरात अपमानास्पद असमानता निर्माण झाली आहे. जगातील एकूण 75 टक्के कोरोना लस फक्त 10 देशांमध्ये देण्यात आली आहे.