Corona two strain infection: कोरोनाच्या(corona) आजवरच्या सर्वात खतरनाक डेल्टा व्हेरिअंटचा धोका जगाला आहे, सावध राहण्याचा इशारा अमेरिकेने दिलेला आहे. अशावेळी बेल्जिअमध्ये हैरान करणारा प्रकार समोर आला आहे. यामुळे कोरोनाच्या या बदलत्या रुपामुळे डॉक्टरांसह संशोधकही धक्क्यात आहेत. (A 90-year-old woman died after becoming infected with two different strains of Covid-19, revealing another risk in the fight against the disease, Belgian researchers found.)
एका 90 वर्षीय महिलेला कोरोनाच्या बदलत्या एक नाही तर दोन वेगवेगळ्या व्हेरिअंटची लागण झाली होती. धक्कादायक म्हणजे यात महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे अल्फा आणि बीटा असे दोन्ही व्हेरिअंटने ती संक्रमित झाली होती. यामुळे संशोधकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ही महिला खूप काळापासून घरात एकटी राहत होती. महिलेने कोरोनाची लस घेतली नव्हती. तिची प्रकृती बिघडल्याने बेल्जिअमच्या आल्स्ट शहरातील ओएलव्ही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी तिचा कोरोना अहवाल पझिटिव्ह आला. सुरुवातीला महिलेची ऑक्सिजन लेव्हल चांगली होती, मात्र काही दिवसांत वेगाने तिची प्रकृती ढासळत गेली. यानंतर महिलेच्या कोरोना सॅम्पलवर संशोधन करण्यात आले तेव्हा तिला अल्फा आणि बीटा व्हेरिअंट दोन्हीची लागण झाल्याचे समोर आसेय अल्फा स्ट्रेन ब्रिटेनमध्ये सापडला होता. तर बीटा स्ट्रेन हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडला होता.
हॉस्पिटलचे मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट आणि रिसर्च टीमचे हेड वेंकीनबर्गन यांनी सांगितले की, ज्या वेळी महिलेला संक्रमण झाले होते, तेव्हा बेल्जिअममध्ये दोन्ही व्हेरिअंटचे संक्रमण वाढत होते. अशावेळी महिलेला दोन व्यक्तींकडून कोरोनाची बाधा झाली असेल. तिला कोरोनाची बाधा कशी झाली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ती या आधी कोणाकोणाला भेटली याची माहिती घेतली जात आहे.
या आधीही दोन रुग्ण सापडलेले...जानेवारीच्या सुरुवातीला ब्राझीलच्या संशोधकांनी कोरोनाच्या दोन स्ट्रेनची लागण झालेले दोन रुग्ण सापडल्याचे म्हटले होते. मात्र, याची माहिती अधिकृतरित्या कुठेही प्रसिद्ध झाली नव्हती. यामुळे संशोधक यावर संशोधन होण्याची गरज व्यक्त करत आहेत.