ब्रिटनमध्ये गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, EG.5.1 समोर आला होता, तो आता देशात वेगाने पसरत आहे. इंग्लंडमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा व्हेरिएंट वेगाने पसरणाऱ्या ओमाय़क्रॉनपासून झाला आहे. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (UKHSA) सांगितले की, EG.5.1 ला 'Eris' हे नाव देण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रत्येक 7 नवीन व्हेरिएंटपैकी एक प्रकरण या व्हेरिएंटमधून बाहेर येत आहे.
UKHSA च्या लसीकरण प्रमुख डॉ मेरी रामसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या आठवड्यातील अहवालांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहत आहोत. सर्व वयोगटातील लोक, विशेषत: वृद्ध लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात येत आहेत. त्यांना जास्त धोका आहे. नियमितपणे हात धुतल्यास, कोरोना आणि इतर व्हायरसना बर्याच अंशी टाळू शकतो. जर एखाद्या रुग्णाला श्वासोच्छवासाच्या आजाराची लक्षणं असतील तर त्याने इतरांपासून शक्य तितकं दूर राहावं.
कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आढळत असताना देखील सध्या हा आजार गंभीर मानला जात नाही. याचे कारण म्हणजे, ब्रिटनमध्ये नवीन व्हेरिएंट कोरोना रुग्णांची संख्या केवळ 14.6 टक्के आहे. UKHSA च्या 'रेस्पिरेटरी डेटामार्ट सिस्टम'ने नोंदवलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.
"सर्व देशांनी सतर्क राहा"
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने दोन आठवड्यांपूर्वी EG.5.1 व्हेरिएंटची चाचणी सुरू केली. WHO महासंचालक टेड्रोस एधानोम गेब्रेयसस म्हणाले की, लस आणि पूर्व-संक्रमणामुळे लोक अधिक संरक्षित आहेत. पण, तरीही सर्व देशांनी सतर्क राहायला हवं. आशियातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, 31 जुलैला कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला वर्गीकृत करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.