ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 31- नवीन वर्षाच्या आगमनासाठी भारतात सगळेजण सज्ज असताना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मात्र नववर्ष साजरं झालं आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात तर ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये नयनरम्य रोषणाईसहित नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोषणाई आणि आतषबाजी करून 2017 चं स्वागत करण्यात आलं. तर सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर नववर्षानिमित्त रोषणाई करत नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. नागरिकांनी नववर्ष साजरं करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
भारतामध्येही नागरिक नवीन वर्ष साजरं करण्यासाठी सज्ज असून मुंबईत लोकांनी चौपाट्यांवर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बार, रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्येही नागरिकांची गर्दी झाली आहे. दुसरीकडे नवीन पोलीस प्रशासन आणि सरकारने नागरिक आणि हॉटेल चालकांना दिलासा दिला असून बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सेलिब्रेशनच्या निमित्ताने घराबाहेर पडणा-या नागरिकांना रात्री फक्त रस्त्यांवर सेलिब्रेशन करायला लागणार नाही.
(Auckland) New Zealand: Countdown to New Year with fireworks at midnight. pic.twitter.com/LQtH7gD2yh— ANI (@ANI_news) 31 December 2016
Australia: Sydney welcomes New Year 2017 with spectacular fireworks pic.twitter.com/L2nPtM862R— ANI (@ANI_news) 31 December 2016
Mumbai: People witness the last sunset of 2016 (Visuals from Juhu Beach) pic.twitter.com/kynKdXVAgO— ANI (@ANI_news) 31 December 2016