कोरोना महामारीचा जगातील अनेक देशांवर वाईट परिणाम झाला. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी या महामारीचा ज्या पद्धतीने सामना केला, त्यासाठी त्याच्या प्रशासनाचे जबरदस्त कौतुक होत आहे. त्यांनी नुकतीच कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारल्या गेलेल्या एका प्रश्नादरम्यान, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, असे काही बदलले, की त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. (New zealand reporter asked question to pm jacinda ardern face expression goes viral)
पत्रकाराने विचारला असा प्रश्न -न्यूझीलंडच्यापंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि आरोग्य महासंचालक डॉ. अश्ले ब्लूमफील्ड कोविड -19 संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देत होते. या दरम्यान एका पत्रकाराने त्याना विचारले, ऑकलंड रुग्णालयातील एक रुग्ण आणि त्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर लैंगिक संबंधाचा आरोप आहे. सध्य स्थितीत, याला हाय-रिस्क कृत्य म्हटले जाऊ शकते का?