गेल्या काही दिवासांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडनं मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनंभारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल. न्यूझीलंडनं घातलेली ही बंदी तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. न्यूझीलंडमध्ये ११ एप्रिल संध्याकाली ४ वाजल्यापासून हा नियम लागू होईल अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल.
Coronavirus : न्यूझीलंडचा मोठा निर्णय; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेश बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 9:46 AM
Coronavirus New Zealand : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा निर्णय, न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू होणार नियम
ठळक मुद्देभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा निर्णयन्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू होणार नियम