शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

न्यूझीलंड 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरला, सुनामीचा इशारा

By admin | Published: November 13, 2016 8:51 PM

न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चजवळच्या भूभागाला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमतवेलिंग्टन, दि. 13 - न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चजवळच्या भूभागाला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. मात्र या भूकंपात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या जिऑलॉजी सर्व्हेनुसार, न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चपासून 91 किलोमीटर उत्तर पूर्वेत स्थानिक वेळेनुसार रात्री 11.02 वाजताच्या सुमारास 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ख्राइस्टचर्च हे न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठं शहर आहे. याआधी फेब्रुवारी 2011मध्ये आलेल्या 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानीसह वित्तहानी झाली होती. त्यावेळी जवळपास 185 लोकांचा मृत्यू झाला होता. ख्राइस्टचर्चच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं फेसबुक पोस्टमधून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आम्ही याबाबत माहिती घेत आहोत. लवकरच याबाबत सविस्तर माहिती देऊ, आता भूकंपामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भूकंपानंतरही छोटे छोटे हादरे बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असंही ख्राइस्टचर्चच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं सांगितलं आहे. या भूकंपाबाबत एका स्थानिकानं सांगितलं की, "आम्ही झोपेत असताना पूर्ण घर हलण्याचा आवाज येऊ लागला. त्यावेळी आमचे डोळे उघडले. तरीही भूकंपाचे सौम्य झटके जाणवत होते." भूकंपाचे केंद्रबिंदूजवळील शहर आणि गावात मोठ्या प्रमाणात वित्तहानी होऊ शकते, अशी शक्यताही ख्राइस्टचर्चच्या आपत्कालीन विभागानं वर्तवली आहे.