होबार्ट : गेल्या ८० वर्षांपूर्वी निर्वंश झालेला टास्मानिया टायगर आढळून आल्याने आॅस्ट्रेलियन प्राणिशास्त्रज्ञांनी या वाघाचा नव्याने शोध घेण्याचा विडा उचलला आहे. १९३० मध्ये टास्मानियय टायगर आढळला होता. या प्रजातीचा शेवटचा बंदिवान टायगर १९३६ मध्ये गतप्राण झाला होता. छळ, नैसर्गिक वसतिस्थान नामशेष होणे आणि आणि रोगराईमुळे ही प्रजाती लुप्त झाली. हा खरा वाघ नाही. लांडग्यासारखा मांसाहारी शिशुधान सस्तन प्राणी आहे. त्याच्या शरीरावर वाघासारखेच पट्टे असतात. आॅस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅण्ड या द्वीपात हा टायगरसदृश प्राणी आढळून आल्याने डॉ. सॅण्ड्रा अबेल यांच्या नेतृत्वाखाली जेम्स कूक विद्यापीठाने नव्याने सर्व्हे हाती घेतला आहे. सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या ठिकाणी ५० हून अधिक उच्चतंत्रज्ञानप्रणालीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टास्मानियन टायगरचा शोध घेतला जात आहे. हा टायगर पाहणाऱ्या एका व्यक्तीच्या हवाल्याने आॅस्ट्रेलियाच्या भौगोलिक संस्थेने म्हटले आहे की, आजवर माझ्या आयुष्यात असा प्राणी पाहिला नाही. तो कुत्र्यासारखाच आहे. कातडी रापलेली आणि पाठीवर दोन्ही बाजूंनी पट्टे आहेत.
टास्मानियन टायगरचा नव्याने शोध
By admin | Published: April 06, 2017 4:48 AM