लग्नानंतर एक कपल हनीमूनवर गेले होते. ते दोघेही गोल्फ बग्गीत बसून एक आयलँड फिरत होते. यावेळी पती यू-टर्न घेण्यासाठी गाडी वळवत असतानाच ती उलटली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मारिना मोर्गन (29) असे पत्नीचे नाव आहे. ती पती रॉबीसह एका ड्रीम हॉलिडेवर गेली होती. याच दरम्यान त्यांची बग्गी उलटली. रॉबी स्वतः तर वाचले, त्यांना काहीही झाले नाही. मात्र, या अपघातात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
ही घटना आस्ट्रेलियातील आहे. येथील क्विंसलँड येथील हॅमिल्टन आयलँडचे व्हिट्संडे बाउलेवार्डवर ही घटना घडली. मारिनाला एक डॉक्टर, एक ऑफ ड्यूटी डेंटिस्ट आणि ऑफ ड्यूटी फायर फायटरने, वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्या लोकांनी संबंधित महिलेला 35 मिनिटांपर्यंत CPR दिला. मात्र, त्यांना वातवलता आले नाही.
सिडनीस्थित या जोडप्याचे 10 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. पोलीस निरीक्षक अँथनी कोवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्याचा अथवा मद्यपान करून वाहन चालविल्याचा कसलाही पुरावा नाही.
याशिवाय, पोलीस निरीक्षक म्हणाले, अशा पद्धतीच्या गाड्या चालविण्याचा अनुभव नसल्याने ही घटना घडल्याचे दिसत आहे. यू-टर्न घेताना ही गाडी घाई-गडबडीत वळवण्यात आली आणि ती उलटली. तसेच घटनेदरम्यान महिलेने सीट बेल्ट लावलेला नव्हता, असेही अँथनी यांनी म्हटले आहे.