काल म्हणजेच 25 डिसेंबरला जगभरात नाताळाचा सण उत्साहात साजरा झाला. नाताळाच्या दिवशी ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी जनतेला संबोधित केले. पण, यादरम्यान एका परदेशी वाहिनीच्या अँकरने चुकून त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकवली. इतकी मोठी चुक झाल्याचे समजताच अँकरने माफी मागून पुढील बातम्या सुरू ठेवल्या. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अँकरने मागितली माफी, व्हिडिओ व्हायरल
द सनच्या रिपोर्टनुसार, अँकर काइली पेंटेलो ख्रिसमसच्या दिवशी शो करत होती. कोरोना लसीबद्दल बोलण्याऐवजी तिने आपल्या शोमध्ये ही एवझी मोठी चूक केली. आयटीव्ही न्यूज स्टुडिओमधून एक कार्यक्रम करत असताना लसीकरणावर बोलण्याऐवजी तिने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी ऐकवली. यानंतर तिला आपली चुक लक्षात आली आणि तिने तात्काळ माफी मागितली.
व्हिडिओवर विविध कमेंट
अँकर काइली पेंटेलोने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली असली तरी हा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर विविध कमेंट्स येत आहेत. एका युजरने ट्विटरवर लिहिले की, आयटीव्ही न्यूजवरील अँकरने पोपचा अपघाती मृत्यू झाल्याची घोषणा केली. दुसऱ्या एका युजरने गंमतीत म्हटले की, 'पोपचा पुढील सहा तासांत मृत्यू झाला तर पोलिस ITV न्यूजची दार ठोठावतील. ही बातमी ऐकून एका यूजरने चिंता व्यक्त केली आणि पोप ठीक असल्याचे सांगितले.
पोप यांचे जनतेला संबोधनफ्रान्सिस पोप सध्या 85 वर्षांचे आहेत. काल म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी व्हॅटिकनमधून त्यांनी ख्रिश्चन धर्मियांना संबोधित केले. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या सावटाखाली जगाने नाताळ साजरा केला. त्यात लोकांची गर्दी खूप कमी असली तरी आणि कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जात होते.