काठमांडू – नेपाळमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची खुर्ची धोक्यात असताना त्यांनी नेपाळी सेनाप्रमुख जनरल पूर्ण चंद्र थापा यांची मुलाखत घेतली आहे. पंतप्रधान ओली यांच्या पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्ष नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे सहअध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांनी लष्कराच्या माध्यमातून पंतप्रधान सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला आहे.
लष्करप्रमुख यांच्याशी ओली यांची भेट झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. नेपाळमध्ये सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान केपी शर्मा ओली लष्काराची मदत घेणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी नेपाळच्या जनतेला पंतप्रधान ओली यांनी संबोधित केले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील सामर्थ्यवान नेते प्रचंड यांची भेट घेण्याबाबत त्यांची बैठक अयशस्वी ठरली.
पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या दबावानंतर ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरु लागली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान ओली हे खुर्ची वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पंतप्रधान ओली यांनी नेपाळी काँग्रेस अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांचीही भेट घेतली. त्यामुळे ओली पंतप्रधानपद टिकवण्यासाठी काँग्रेससोबत जात नवीन आघाडीही बनवू शकतात या चर्चेला उधाण आलं आहे.
अशातच नेपाळच्या राजकीय वर्तुळात पुढील २४ तास खूप महत्त्वाचे मानले जात आहे. प्रचंड यांचा आरोप आहे की, ओली सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. ते नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पाडू शकतात त्याचसोबत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्येही पाठवू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र अलीकडेच नेपाळ सरकारने जे निर्णय घेतले त्यानंतर सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात भारताचाही हात आहे. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा हे भारताचे तीन भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केल्यानंतर त्यांना हटविण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. त्यात नेपाळचे काही नेतेही सामील आहेत. पक्षाच्या मागील मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रचंड यांचा आरोप योग्य नाही, असे मत ओली यांच्याकडून मांडण्यात आले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश
कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी
Exclusive: १७ रुपयांच्या मास्कची खरेदी २०० रुपयांना; आरोग्य विभागाकडून वारेमाप लूट
हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र
…तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय?; शिवसेनेचा भाजपा सरकारवर हल्लाबोल