सिंगापूर : विदेशी चलन विनिमय बाजारातील चढ-उतार पाहता येत्या दीड वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ६६ ते ६८ रुपयांदरम्यान राहील. अशा स्थितीत रिझर्व्ह बँक चलन विनिमय दरातील घट-वाढीला चाप लावण्यादसाठी हस्तक्षेप करू शकते.परकीय गंगजाळीत ३५३ अब्ज डॉलर असल्याने भारताची आगामी नऊ ते दहा महिन्यांतील आयातीची गरज सहज भागविणे शक्य आहे. तथापि, आवश्यकता भासल्यास रिझर्व्ह बँक निर्णायक भूमिका घेत हस्तक्षेप करू शकते, असे डोयचे बँकेने आशिया आर्थिक या विषयावरील मासिक अहवालात म्हटले आहे.व्याजदर सामान्य पातळीवर आणण्याचे अमेरिकेचे धोरण, राजकीय अस्थिरता, युआनचे आणखी अवमूल्यन होण्याची जोखीम यामुळे पुढच्या वर्षी विदेशी चलन विनिमय बाजार चढ-उताराचे हिंदोळे घेत राहील.महसूल वसुलीत फारसा जोर दिसत नाही. गुंतवणूकदार निराश आहेत. अशात सरकारने भांडवली खर्चात कपात केल्यास त्याचा परिणाम आर्थिक वृद्धीवर होऊ शकतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आगामी दीड वर्षात रुपयाची बिकट वाट
By admin | Published: December 10, 2015 11:29 PM