नवी दिल्ली : Nissan आता भारतीय बाजारासह जागतिक बाजारात एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही उतरवणार आहे. ही एसयुव्ही निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) नावाने बाजारात आणली जाण्याची शक्यता असून मारुतीच्या ब्रेझा आणि ह्युंदाईच्या व्हेन्यूला टक्कर देणार आहे. या 4 मीटर छोट्या एसयुव्हीचे जागतिक अनावरण 16 जुलैला होणार आहे. आज कंपनीने या एसयुव्हीचा टीझर दाखविला आहे.
या टीझरमध्ये मॅग्नाईटचा पुढील लूक दिसत असून मोठे व्हील आर्च, ऑफ रोड टायरसोबत मोठे व्हील आणि स्कफ प्लेटस् देण्यात आले आहेत. यानुसार हे फोटो कॉन्सेप्ट मॉडेलचे असल्याचे स्पष्ट होते. मात्र, या फोटोतून मॅग्नाईटची आणखी काही माहिती समोर आली आहे.
मॅग्नाईटमध्ये शार्प लूकच्या एलईडी हेडलाईट देण्यात येणार आहेत. ज्या निसान किक्स एसयुव्हीसारख्या दिसतात. तर या मॅग्नाईटचे L-आकाराचे डीआरएल हे नुकतीच लाँच झालेल्या दॅटसनच्या रेडी-गो फेसलिफ्टसारखे आहेत. मॅग्नाईटला मोठी ग्रील देण्यात आली आहे. फोटोवरून हे स्पष्ट होत आहे की, एसयुव्हीच्या साईडला मोठे बॉडी क्लॅडिंग असणार आहे.
निसानच्या मॅग्नाईटमध्ये दोन इंजिन ऑप्शन असणार आहेत. यामध्ये 72hp ताकदीचे 96Nm टॉर्कवाले 1.0-लीटर, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटीचा पर्याय मिळणार आहे. दुसरे इंजिन 1.0 लीटरचेच परंतू 3-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे. जे 95hp ची ताकद दोणार आहे. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय असण्याची शक्यता आहे.
किंमत किती असेल? निसानच्या या छोट्या एसयुव्हीची किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर सीव्हीटीसह टर्बो-पेट्रोल इंजनच्या मॉडेलची किंमतही 6 लाखांच्या आसपास ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे.
केव्हा लाँचिंग?ही एसयुव्ही ऑगस्ट 2020 मध्येच लाँच होणार होती. मात्र, या कोरोनामुळे या कारची लाँचिंग टाळण्य़ात आले. आता ही एसयुव्ही 16 जुलैला जगासमोर आणण्यात येणार असली तरीही ती 2021 मध्येच भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
आता नितीन गडकरी उतरले मैदानात; चिनी कंपन्यांना दणका देण्याचा जबरदस्त 'हायवे प्लॅन' तयार
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन
नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले