सध्याच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. समाजात तुम्हाला आदराचे स्थान, मान-सन्मान आणि आर्थिक सुबत्ता हवी असेल तर शिक्षणातूनच हा बदल कमावता येतो. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अपडेटही राहावं लागतं. मात्र, कौशल्य हेही पैसा आणि नाव कमावण्याचं सर्वात कुशल तंत्र आहे. एका महिलेनं असंच स्वत:कडील कलेच्या माध्यमातून नाव आणि आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. एकीकडे शिकून-सवरुन नोकरी मिळवणं अवघड बनलं आहे. पण, दुसरीकडे एक महिलेनं कुठलीही पदवी न प्राप्त करता, लाखोंचं पॅकेज मिळवलं आहे.
डायना ताकाक्सोवा असं या महिलेचं नाव असून तिला तब्बल ६३ लाख रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. ३४ वर्षीय डायना ताकाक्सोवा स्लोवाकियातील सेंट एल्बांसची रहिवाशी आहे. डायनाचं बालपण हालाकीच्या परिस्थितीत गेलं, घरातील गरिबीच्या परिस्थितीमुळे लहानपणीच काम करण्याचा संघर्ष निशिबी आला. या परिस्थितीशी लढा देत डायना आता वर्षाला £55,000 म्हणजे ५८ लाख रुपये बेसिक पगाराची नोकरी करत आहेत. तर, तिला २ लाख १० हजारांचा बोनसही दिला जातो.
डायनाला ही नोकरी नेमकी कशी मिळाली आणि कुठलीही पदवी न घेता मिळाल्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत असेल. मग, ती नोकरी नेमकी काय, याबाबत थोडं जाणू घेऊ. डायना हेव्ही ड्रायव्हर म्हणून नोकरी करत आहेत. केमिकल, पेट्रोलियम, फूड अँड गॅस ट्रांसपोर्ट करण्याचं अवजड काम डायना करते. डायनाच्या या ड्रायव्हींग कौशल्याच्या जोरावर तिला हेव्ही ड्रायव्हींग इंडस्ट्रीतून अनेक मोठ्या ऑफर्स आहेत. कारण, महिला या व्यवसायात किंवा क्षेत्रात अगदी गनण्यच आहेत. डायना वयाच्या १४ व्या वर्षांपासून काम करते. मात्र, वयाच्या २१ नंतर तिने ड्रायव्हींग क्षेत्रात स्वत:चं नशिब आजमावलं.
जसं जसं तिने हे स्कील अवगत केलं, तसं तसं तिला मोठ्या संधी मिळत गेल्या. त्यातून ती आर्थिकदृष्ट्या स्थीर बनली. म्हणूनच ती महिलांना या क्षेत्रात करिअर म्हणून पाहण्याचा सल्ला देते. तसेच, हेव्ही ड्रायव्हींगच्या क्षेत्रात स्वत:ला करिअर घडवण्याच्या संधी असल्याचं सांगते.