कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटननं यापूर्वी लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधानबोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिट्टी यांनी ब्रिटननं यापुढे कोरोना विषाणूसोबत तापाप्रमाणेच (फ्लू) जगायला शिकलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. इंग्लंड निर्बंधांमधू बाहेर पडल्यानंतर लॉकडाउन ही भूतकाळातील गोष्ट होईल. तसंच भविष्याच ब्रिटन करोना विषाणूशी तापाप्रमाणेच (फ्लू) वागेल, असं प्राध्यापक ख्रिस व्हिट्टी यांनी सूचवलं. "ब्रिटनला आता कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावं लागेल. हे पाहता की २५ हजार जणांचे मृत्यू फ्लूमुळे वर्षभरात होऊ शकतात. ही संख्या मथळा झाल्याशिवायही होऊ शकते," असं ते म्हणाले. हे स्पष्ट आहे की आपण या आजाराचं व्यवस्थापन करू शकतो, जसं काही ठिकाणी आपण फ्लूबाबत करतो. हा एक हंगामी आणि धोकादायक आजार आहे, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण जात असल्याचंही ते म्हणाले.
रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनच्या आयोजित वेबिनारमध्ये ख्रिस व्हिट्टी सहभागी झाले होते. यादरम्यान बोलताना त्यांनी कोरोनावर भाष्य केलं. जर धोकादायक स्ट्रेन वेगानं पसरला तरच सरकारला यावर काही मोठं पाऊल उचलणं भाग पडेल. परंतु कोरोनाची म्युटेशन्स देशाच्या बाहेर ठेवली जातील हे म्हणणं वास्तववादी ठरणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "सरकारचं ध्येय कोरोनामुळे होणारे मृत्यू अगदी किमान स्तरावर आणणं हे आहे. परंतु असा इशारा दिला की, हंगामी फ्लूने होणाऱ्या मृत्यूंच्या समान संख्येस रोखण्यासाठी समाज व्यापक निर्बंध सहन करणार नाही," असंही व्हिट्टी म्हणाले.संतुलन निर्माण करण्याची गरजआपल्याला काही प्रमाणात संतुलन निर्माण करण्याची गरज आहे. ज्यामुळे आपल्याला मृत्यूदर कमी ठेवण्यास मदत होईल. परंतु ते अशाप्रकारे ठेवले पाहिजे की जनतेलाही ते शक्य होईल. लसीकरण, औषधं देणं अशा प्रकारांमधून आपण मृत्यूदर कमी करू शकतो. परंतु यावेळी नागरिकांवर आर्थिक आणि सामाजिक परिणामही जास्त होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.