ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १० - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यादरम्यान ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ची दुसरी फेरी आज पार पडली. या चर्चेदरम्यान दोघांनी एकमेकांवर विविध विषयांवरून निशाणा साधत आरोप - प्रत्यारोप केले. तसेच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास आगामी योजनाही नमूद केले. या चर्चेच्या एकूण तीन फे-या असून त्यातील दोन फे-या पार पडल्या आहेत. लवकरच तिसरी व निर्णायक अंतिम फेरी पार पडेल व ८ नोव्हेंबर मतदान झाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा कोणाकडे जाईल हे स्पष्ट होईल.
यावेळी ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्या वादग्रस्त ईमेल्सचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत मी निवडणूक जिंकलो, तर त्या वादग्रस्त ईमेल्सची चौकशी करेन असे आश्वासन दिले. तर हिलरी यांनी ट्रम्प यांची महिलांविषयीची वागणूक तसेच त्यांच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधत ' ट्रम्प व त्यांची करप्रणाली अमेरिकेला पुन्हा आर्थिक मंदीकडे घेऊन जाईल' अशी टीका केली.
दुस-या फेरीच्या चर्चेचे महत्वपूर्ण मुद्दे :
- सर्व अमेरिकन जनता एकत्र आली तर आपण चांगले काम करू शकतो याबद्दल मी आशावादी आहे - हिलरी क्लिंटन
- मला अमेरिकेच्या सर्व लोकांची प्रतिनिधी म्हणून राष्ट्राध्यक्ष बनायचं आहे - हिलरी क्लिंटन
- मी सर्व महिलांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे - महिलांसंदर्भात करण्यात आलेल्या टीकांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे उत्तर
- २००५ साली रेकॉर्ड करण्यात आलेला तो व्हिडिओ म्हणजे खासगी गप्पा होत्या. त्याबद्दल मी खरच खेद व्यक्त करतो - डोनाल्ड ट्रम्प
- मी कधीच कोणत्याही महिलेल्या तिच्या परवानगीशिवाय स्पर्श वा कीस किस केलेले नाही - डोनाल्ड ट्रम्प
- बिल क्लिंटन महिलांवर अश्लील शेरेबाजी करायचे. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा.
- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे नाही - हिलरी क्लिंटन
- महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी करणारा ट्रम्प यांचा व्हिडिओ त्यांचा खरा चेहरा दाखवतो - हिलरी क्लिंटन
- मी प्रत्येक अमेरिकन व्यक्तीच्या बरोबरीने काम करेन - हिलरी क्लिंटन
- डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची माफी मागायला हवी, त्यांनी एका शहीदाचा त्याच्या धर्मावरून अपमान केला आहे - हिलरी क्लिंटन
- मी निवडणूक जिंकल्यास हिलरींच्या वादग्रस्त ईमेल्सची चौकशी करेन व योग्य ती कारवाई करेन - डोनाल्ड ट्रम्प
- ज्या व्यक्तीकडून अमेरिकेला धोका आहे अशा कोणत्याही शरणार्थ्यांना अमेरिकेमध्ये घुसू देणार नाही - हिलरी क्लिंटन
- सत्तेत आल्यास इसिसला संपवेन - डोनाल्ड ट्रम्प
- हिलरी यांची निर्णय क्षमता इतकी वाईट आहे की त्या कधीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत - डोनाल्ड ट्रम्प
- रशियाबरोबर चांगले संबंध ठेवणे अमेरिकेच्या फायद्याचे आहे - डोनाल्ड ट्रम्प
- डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टॅक्स रिटर्नची माहिती जाहीर करायला हवी - करचुकवेगिरीप्रकरणावरून हिलरी क्लिंटन यांची ट्रम्प यांच्यावर टीका
- सध्या ऑडीट सुरु आहे, ते झाल्यानंतर मी माझ्या टॅक्स रिटर्नची माहिती जाहीर करेन - करचुकवेगिरीप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा
- मी सिरियामध्ये अमेरिकन सैन्याचा वापर करणार नाही, ती खूप मोठी चूक ठरेल - हिलरी क्लिंटन
- हिलरी क्लिंटन यांच्या मनात द्वेषाची भावना आहे, त्या नेहमी रशियाला दोषी ठरवतात- डोनाल्ड ट्रम्प
- हिलरी फक्त बोलतात, पण (त्यांची) कृती काहीच दिसत नाही - डोनाल्ड ट्रम्प
- तुम्ही मला मतदान केले नाहीत तरी मला तुमची राष्ट्राध्यक्ष व्हायचे आहे - हिलरी क्लिंटन
- डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची करप्रणाली अमेरिकेला पुन्हा आर्थिक मंदीच्या दिशेने घेऊन जाईल - हिलरी क्लिंटन