शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘नोबेल’ हवंय ? किती पैसे देता बोला !

By admin | Published: October 04, 2015 4:24 AM

जगातील सर्वोच्च पुरस्कारादाखल दिले जाणारे नोबेल पदक आपल्याही गळ््यात पडावे, असे वाटत असल्यास त्यासाठी सदैव युद्धसदृश परिस्थितीत असलेल्या मध्यपूर्वेत

आॅस्लो : जगातील सर्वोच्च पुरस्कारादाखल दिले जाणारे नोबेल पदक आपल्याही गळ््यात पडावे, असे वाटत असल्यास त्यासाठी सदैव युद्धसदृश परिस्थितीत असलेल्या मध्यपूर्वेत शांतता प्रथापित करण्याची, विज्ञानाचे एखादे गूढ रहस्य उलगडण्याची किंवा एखादी अजरामर साहित्यकृती निर्माण करण्याची काही गरज नाही. योग्य किंमत मोजायची तयारी असेल तर तुम्हाला हे नोबेल पदक लिलावातही मिळू शकते!यात धक्का बसण्यासारखे काही नाही. दानशूर स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी १८९५ मध्ये आपल्या मृत्युपत्राद्वारे या पुरस्कारांची स्थापना केल्यापासून गेल्या ११४ वर्षांत शांतता, साहित्य, वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्रातील आणि १९६९ पासून अर्थशास्त्रातील अद्वितीय कामगिरीबद्दल एकूण ८८९ नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. परंतु कालपरत्वे पुरस्कार विजेत्यांना आर्थिक विपन्नावस्था आल्याने किंवा त्यांच्या वारसदारांमधील वादांमुळे यापैकी किमान डझनभर नोबेल सुवर्णपदके व डिप्लोमा लिलावात विकले गेले आहेत.सर आल्फ्रेड नोबेल यांनी ‘मानवासाठीचा सर्वात महान लाभ’ या भावनेतून या पुरस्कारांकडे पाहिले असले तरी लिलावात विकल्या जाणाऱ्या नोबेल पदकांच्या नशिबी अशीच महत्ता येतेच असे नाही. नाही म्हणायला लिलावात विक्रीसाठी आलेल्या नोबेल पदकांसाठी पूर्वीपेक्षा अलीकडच्या काळात अधिक चढ्या बोली लागताना दिसतात. शिवाय लिलाव होत असलेले नोबेल पदक कोणाला व कशासाठी दिलेले होते यावरही त्याची किंमत ठरत असल्याचा काहीसा कल दिसतो.फ्रान्सच्या अ‍ॅरिस्टाईड ब्रियांद यांना १९२६ मध्ये शांततेसाठी दिले गेलेले नोबेल पदक आजवर लिलावात सर्वात कमी किंमतीला विकले गेलेले नोबेल पदक आहे. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्स व जर्मनी या परस्परांना पाण्यात पाहणाऱ्या देशांमध्ये सलोखा घडवून आणल्याबद्दल ब्रियांद यांना नोबेल देऊन गौरविण्यात आले होते. हा सलोखा अल्पजीवी ठरला, ही गोष्ट अलाहिदा. २००८ मध्ये ब्रियांद यांचे नोबेल पदक अवघ्या १२,२०० युरोला (आजचे १३,६५० डॉलर) विकले गेले. त्यामानाने ब्रिटनच्या विल्यम रॅण्डल क्रेमर यांच्या १९०३ मधील नोबेल पदकाला १९८५ साली झालेल्या लिलावात थोडी जास्त म्हणजे १७ हजार डॉलर एवढी किंमत आली.पण कालांतराने परिस्थिती बदल गेली. आता या पदकांच्या लिलावातील किंमतीही आकाशाला भिडत आहेत. परिणामी पुरस्कार विजेते अथवा त्यांचे कुटुंबिय आपला हा अमूल्य ठेवा विकण्यासाठी अधिक संख्येने पुढे येत आहेत.पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्रासाठी दिली गेलेली नोबेल पदके लिलावात तीन ते चार लाख डॉलरच्या दरम्यान विकली गेली आहेत. (वृत्तसंस्था)93 वर्षांचे असलेल्या अमेरिकेच्या लिआॅन लीडरमॅन यांनाही त्यांच्या नोबेल पदकास यंदाच्या मेमधील लिलावात ७.६५ लाख डॉलर एवढी घवघवीत किंमत मिळाली. लीडरमॅन यांना हे नोबेल १९८८ मध्ये पदार्थ विज्ञानासाठी दिले गेले होते. बेल्जियमच्या आॅगस्ट बीरनॅएर्ट यांचे शांततेसाठीचे १००९ चे नोबेल पदक -६.६१ लाख डॉलर.1936 चे अर्जेंटिनाच्या कार्लोस सावेंद्रा लामास यांचे १९३६ चे नंतर भंगाराच्या दुकानात सापडलेले नोबेल पदक-१.१६ दशलक्ष डॉलर.मानवी डीएनएच्या संरचनेच्या शोधाबद्दल अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स वॅटसन यांच्या नोबेल पदकास (१९६२मध्ये दिलेले ) आजवरची सर्वाधिक बोली मिळाली. डिसेंबर २०१४ मध्ये ते ४.७६ दशलक्ष डॉलरना विकले गेले. स्वत:च्या हयातीत नोबेलचा लिलाव करणारे म्हणूनही वॅटसन यांचे वेगळेपण आहे. रशियन अब्जाधीश उद्योगपती अलिशर उस्मानॉव्ह यांनी लिलावात घेतलेले ते पदक शोधाची महत्ता लक्षात घेऊन नंतर त्यांना परत केले. मात्र याच शोधासाठी वॅटसन यांच्यासोबत ज्यांना विभागून नोबेल दिले गेले होते त्या ब्रिटनच्या फ्रान्सिस क्रिक यांनी मात्र त्यानंतर २० महिन्यांनी आपले नोबेल पदक लिलावात काढले तेव्हा त्यांना निम्मीच किंमत मिळाली.ख्यातनाम अमेरिकन लेखक विल्यम फॉकनर यांचे १९४९चे साहित्यासाठीचे नोबेल पदक त्यांच्या कुटुंबीयांनी २०१३ मध्ये लिलावात मांडले. पण अपेक्षेप्रमाणे पाच लाख डॉलरपर्यंत बोली न आल्याने कुटुंबीयांनी नोबेल पदक लिलावातून काढून घेतले.फ्रान्सच्या अ‍ॅरिस्टाइड ब्रियांद यांना १९२६ मध्ये शांततेसाठी दिले गेलेले नोबेल पदक आजवर लिलावात सर्वात कमी किमतीला विकले गेलेले नोबेल पदक आहे. २००८ मध्ये त्याला १२,२०० युरो मिळाले.