स्टॉकहोम : या वर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार बेलारूसमधील लेखिका स्वेतलाना एलेक्झिएव्हीच (६७) यांना गुरुवारी जाहीर झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदनांचे लिखाण, वेदनांना वाङ्मयाचे रूप देणे व आमच्या काळातील अतुलनीय धाडसाबद्दल हा सन्मान असल्याचे स्वीडिश अॅकॅडमीने म्हटले. दुसरे महायुद्ध आणि चर्नोबिल अणुभट्टी दुर्घटनेतील पीडितांशी स्वत: बोलून त्यांनी ज्या भावनांना शब्दबद्ध केले त्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली होती. स्वेतलाना एलेक्झिएव्हीच यांनी त्या दु:खद घटनांतील पीडितांशी थेट बोलून प्रथमपुरुषी स्वरूपात लिखाण केले. त्यांच्या वाङ्मयाचे अनेक भाषांत अनुवाद झाले व त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही लाभले.
स्वेतलाना यांना साहित्याचे नोबेल
By admin | Published: October 09, 2015 5:09 AM