स्टॉकहोम - जगभरात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला (World Food Programme) जाहीर झाला आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटासह जवळपास 300 हून अधिक व्यक्तींची नाव या पुरस्कारासाठी चर्चेत होती. युद्ध-संघर्षग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली आहे.
'वर्ल्ड फूड प्रोगाम'ने 2019 मध्ये 88 देशांतील जवळपास 100 मिलियन लोकांना मदत केली आहे. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी 'वर्ल्ड फूड प्रोगाम' सर्वात मोठी संघटना आहे. तसेच अमेरिकन कवयित्री लुईसे ग्लूक यांना साहित्यासाठी ‘कँडीड अँड अनकॉम्प्रमायझिंग’साठी नोबेल पारितोषिक गुरुवारी जाहीर झाले. 2016 मध्ये अमेरिकेचे बॉब डायलॅन यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर ग्लूक या हा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्याच अमेरिकन ठरल्या आहेत.
कवयित्री लुईसे ग्लूक यांना साहित्यासाठीचा नोबेल
नोबेल समितीने ग्लूक यांच्या ‘काव्य लेखनाने प्रत्येकाचे अस्तित्व हे वैश्विक बनण्यास सुंदर मदत केली आहे’, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे. स्विडीश अकॅडमीचे स्थायी सचिव मॅट्स माम यांनी येथे या पुरस्काराची घोषणा केली. ग्लूक यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला असून त्या येल युनिव्हर्सिटीत इंग्रजीच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी 1968 मध्ये ‘फर्स्टबॉर्न’ लिहून आपला लेखन प्रवास सुरू केला आणि लवकरच त्या अमेरिकेत समकालीन वाङ्मयात प्रमुख कवयित्री म्हणून प्रसिद्ध झाल्या.
तीन शास्त्रज्ञांना Hepatitis C virus च्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर
स्वीडनच्या स्टॉक होम शहरात वैद्यकिय क्षेत्रातील औषधांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी या नोबल पुरस्कर हार्वे अल्टर, मायकल होऊगटन आणि चाल्स राईस यांना देण्यात आला आहे. या वैज्ञानिकांना हिपेटायटीस सी व्हायरसच्या संशोधनातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच त्याची अधिकृत घोषणा Karolinska Institutet in Stockholm मध्ये नोबेल फोरम वर करण्यात आली आहे. दरवर्षीच या पुरस्काराच्या विजेत्यांबद्दल कुतुहल असते. मेडिसीन क्षेत्रातील मानकर्यांना निवडण्याासाठी 5 तज्ज्ञांची टीम काम करत होती. त्यानुसार हिपेटायटीस सी च्या व्हायरसचं संशोधन करणार्या तिघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.