शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शांततेचे नोबेल आयएसीएन संस्थेला जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 3:02 PM

वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देवैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले.यंदाचे शांतताक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल आयएसीएन म्हणजेच इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबोलिश न्यूक्लीअर वेपन्सला जाहीर झाले आहे.

स्टॉकहोम- जगातील सर्वोच्च आणि सर्वाधीक सन्मानाचे समजले जाणारे नोबेल पुरस्कार गेले चार दिवस जाहीर होत आहेत. वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले. यंदाचे शांतताक्षेत्रातील योगदानाबद्दलचे नोबेल आयएसीएन म्हणजेच इंटरनॅशनल कॅम्पेन टू अॅबोलिश न्यूक्लीअर वेपन्सला जाहीर झाले आहे. आयएसीएन जगातल्या १०० देशांमध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अण्वस्त्रांचा वापर सर्व देशांनी बंद करावा या ध्येयासाठी ही संघटना काम करते .काल साहित्याचे नोबेल ब्रिटिश लेखक कॅश्युओ इशिग्युरो यांना जाहीर करण्यात आले.

२७ नोव्हेंबर १८९५ रोजी आल्फ्रेड नोबेलने पॅरिसमध्ये त्याच्या शेवटच्या मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली. त्यामध्ये आपण मिळवलेल्या संपत्तीमधून वैद्यकशास्त्र,  साहित्य, रसायनशास्त्र, शांतता आणि पदार्थविज्ञान या क्षेत्रात योगदान देणार्या लोकांचा सन्मान करावा असे त्याने लिहून ठेवले होते. १९०१ पासून हे सन्मान देण्यास सुरुवात झाली. आजवर पदार्थविज्ञानाचे ११०, रसायनशास्त्राचे १०८, वैद्यकशास्त्राचे १०७, साहित्याचे १०९, शांततेचे ९७, अर्थशास्त्राचे ४८ नोबेल देण्यात आहेत. यावर्षी जेफ्री सी हाँल, मायकल रोशबॅश, मायकल यंग यांना वैद्यकशास्त्राचे, रेइनर वेईस, बेरी बॅरिश व किप थॉर्न यांना पदार्थविज्ञानाचे तर जँक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅक, रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोबेल मिळवणारे ते आशियातील पहिले नागरिक होते. त्याचबरोबर हरगोविंद खुराणा, सी. व्ही. रमण, मदर तेरेसा, अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, व्ही.एस नायपाँल, सुब्रमण्यन चंद्रशेखर, व्यंकटरमण रामकृष्णन या भारतीय किंवा भारतीय वंशाच्या लोकांना नोबेल मिळाले तर भारताशी संबंधित असणाऱ्या रोनाल्ड रॉस, रुडयार्ड किपलिंग आणि दलाई लामा यांचाही नोबेलने सन्मान करण्यात आलेला आहे.