शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

लोकशाही समर्थक नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू की यांना 4 वर्षांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 1:00 PM

म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांच्यावर देशातील नागरिकांना सैन्याविरोधात भडकावल्याचा आरोप आहे.

म्यानमारच्या नोबेल पारितोषिक विजेत्या आणि लोकशाही समर्थक नेत्या आंग सान सू की यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लष्कराविरुद्ध असंतोष भडकवल्याबद्दल आणि कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे. म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी 2021 च्या रात्री लष्कराने सू की यांना सत्तापालट करुन अटक केली होती. 

सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, माजी राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांनाही याच आरोपाखाली चार वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, परंतु त्यांना अद्याप तुरुंगात टाकलेलं नाही. 1 फेब्रुवारी रोजी लष्कराने देशात प्रवेश केल्यापासून 76 वर्षीय सू की लष्कराच्या ताब्यात आहेत. आता त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

सत्ता पालटानंतर लष्करी नेते जनरल मिन आंग हुलिंग हे देशाचे पंतप्रधान बनले आहेत. याबाबत बोलताना जनरल हुलिंग म्हणाले की, देशातील आणीबाणी 2023 मध्ये हटवली जाईल आणि सार्वत्रिक निवडणुका होतील. या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता, ज्यात 940 लोकांचा मृत्यू झाला. नोव्हेंबर 2020 मध्ये म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सू की यांच्या पक्षाने दोन्ही सभागृहात 396 जागा जिंकल्या होत्या. 

शेकडो लोक मारले गेले

स्थानिक वॉचडॉग ग्रुपच्या म्हणण्यानुसार, सत्तापालटानंतर देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. या लोकांचा आवाज दाबण्यासाठी लष्कराने हिंसक पद्धतींचा वापर केला. ज्यामध्ये 1300 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 10,000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र तरीही देशातील अनेक भागात आंदोलने थांबत नाहीत. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPrisonतुरुंग