नवी दिल्ली: रॉयल स्वीडिस अकॅडमीकडून आज अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. नोबेल समितीने श्रम अर्थशास्त्रातील अनुभवजन्य योगदानासाठी डेव्हिड कार्ड यांना अर्धे आणि उर्वरित अर्धे बक्षीस संयुक्तपणे जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गुइडो डब्ल्यू इम्बेन्स यांना विश्लेषणातील योगदानासाठी दिलं आहे.
अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर करताना स्वीडिश अकॅडमीने म्हटले की, 'या वर्षीचे पुरस्कार विजेते डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुइडो इम्बेन्स यांनी बाजाराबद्दल नवीन अंतर्दृष्टी दिली आणि नैसर्गिक प्रयोगांमधून कोणती कारणे आणि परिणाम निष्कर्ष काढता येतील ते दाखवलं. त्यांचा दृष्टिकोन इतर क्षेत्रात पसरला आणि संशोधनात क्रांती झाली.'
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस स्टॉकहोमद्वारे प्रदान केले जातात. नोबेल फाउंडेशनला बँकेच्या 300 व्या वर्धापन दिनानिमित्त 1968 मध्ये स्वेरिग्स रिक्सबँक कडून देणगी मिळाली. हा पुरस्कार त्या देणगीवर आधारित आहे.