नवी दिल्ली: नुकतंच रॉयल स्वीडीश अकॅडमीनं 2021 साठीच्या वैद्यकशास्त्रा, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा केली. त्यानंतर आता आज साहित्य क्षेत्रातील नोबेलची घोषणा करण्यात आली आहे. कांदबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यंदाचा साहित्यातील नोबेल जाहीर झाला आहे.
रॉयल स्वीडीश अकॅडमीनं ट्विटरवर या पुरस्काराची घोषणा करताना, अब्दुलरझाक गुरनाह यांनी त्यांच्या लेखनीतून संस्कृती, शरणार्थीचं भविष्य यासंदर्भात लिखाण केलं आहे, असं म्हटलं. लेखक अब्दुल रझाक गुरनाह यांनी त्यांच्या लिखाणातून पूर्व आफ्रिकेतील स्थिती, आखाती देशातील स्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. यापूर्वी, 2020 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल अमेरिकी कवियत्री लुईस ग्लूक यांना जाहीर झाला होता.
अब्दुल रझाक यांचा परिचयअब्दुलरझाक गुरनाह यांचा जन्म 1948 मध्ये झंझीबार बेटावर झाला. नंतर ते इंग्लंडला शरणार्थी म्हणून गेले. त्यांच्या आतापर्यंत 10 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, त्यांनी लघू कथांचे लेखनदेखील केलं आहे. सध्या ते इंग्लंडमधील केंटरबरी येथील केंट विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते.